इचलकरंजीत सलग पाचव्या दिवशी पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:25 IST2021-05-21T04:25:59+5:302021-05-21T04:25:59+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : शहर व परिसरातील विनामास्क, मॉर्निंग वॉक व विनाकारण फिरणाऱ्या तसेच क्रिकेट खेळणाऱ्या नागरिकांवर पोलिसांनी ...

Police action in Ichalkaranji for the fifth day in a row | इचलकरंजीत सलग पाचव्या दिवशी पोलिसांची कारवाई

इचलकरंजीत सलग पाचव्या दिवशी पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : शहर व परिसरातील विनामास्क, मॉर्निंग वॉक व विनाकारण फिरणाऱ्या तसेच क्रिकेट खेळणाऱ्या नागरिकांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. गावभाग, शिवाजीनगर व शहापूर पोलिसांनी सलग पाचव्या दिवशी ११७ जणांवर दंडात्मक कारवाई केली. दररोज कारवाई करूनही नागरिक बेफिकीरपणे फिरत असल्याने पोलिसांची डोकेदुखी ठरत आहे.

प्रशासन लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर गेल्या पाच दिवसांपासून विनामास्क, मॉर्निंग वॉक व विनाकारण फिरणाऱ्यांवर सातत्याने कारवाई करत आहे. तरीही काही महाभाग प्रशासनाच्या निर्णयाला वाटाण्याच्या अक्षता दाखवत आहेत. बेजबाबदार नागरिकांवर वचक निर्माण व्हावा, यासाठी गावभाग ३९, शिवाजीनगर ५४ व शहापूर पोलिसांनी २४ अशा एकूण ११७ नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली आहे, तर शिवाजीनगर पोलिसांनी कोल्हापूर रोडवरील महेश कॉलनी परिसरातील क्रिकेट खेळणाऱ्या १० जणांवर कारवाई केली. यावेळी लहान मुलेही क्रिकेट खेळत असून त्यांच्याकडून कोणतेही कोरोना नियमांचे पालन केले जात नव्हते.

Web Title: Police action in Ichalkaranji for the fifth day in a row