शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गटबाजीचे ध्रुवीकरण

By admin | Updated: September 11, 2014 23:18 IST

इचलकरंजीतील राजकारण : सत्वशील मानेंची भूमिका, फलकाचा वाद

इचलकरंजी : नगरपालिकेतील राजकारण, सत्वशील माने यांची भूमिका आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या मंचावरील फलक अशा तिन्ही वेगवेगळ्या घटनांमुळे येथील राष्ट्रवादी कॉँग्रेसमधील गटबाजीची दरी रुंदावली आहे. विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.शहरातील राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये अनेक गट आहेत. प्रत्येक गटाने वस्त्रोद्योग व शेतीमाल प्रक्रिया यासाठी आपापल्या सहकारी संस्था स्थापन केल्या आणि स्वत:चे स्वतंत्र ‘राज्य’ निर्माण केले आहे. या सर्व संस्था स्थापन करून त्यांच्या मंजुरीसाठी तत्कालीन खासदार निवेदिता माने यांचे योगदान सर्वांनाच मिळाले आहे. शहर आणि परिसराच्या राजकीय क्षेत्रात या सर्व गटांचे स्वतंत्र अस्तित्व असले, तरी माजी खासदार माने यांच्या निवडणुकीसाठी सर्व गट एकत्रित येऊन कामाला लागत असत. याउलट विधानसभा निवडणुकीवेळी ‘आवाडे’ यांच्या विरोधात उभे ठाकत असत.अशा पार्श्वभूमीवर सध्या नगरपालिकेत राष्ट्रीय व राष्ट्रवादी अशी दोन्ही कॉँग्रेसची आघाडी सत्तेत आहे. त्यातील राष्ट्रवादीचे पक्षप्रतोद रवींद्र माने असून, पालिकेतील राजकारण माजी आमदार अशोकराव जांभळे हाताळत आहेत. पालिकेतील जांभळे व माने यांच्या राजकीय हालचाली आणि त्यांची राष्ट्रीय कॉँग्रेसबरोबर असलेली ‘सलगी’ यामुळे राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष मदन कारंडे व त्यांचा गट त्यांच्यापासून दुरावला आहे.राष्ट्रवादीने विसर्जन मिरवणूक मार्गावर नेहमीप्रमाणे नारायण टॉकीजसमोर स्वागत मंच उभारला होता. मंचावरील फलकावरून श्रीमती निवेदिता माने, अशोकराव जांभळे व रवींद्र माने यांची छायाचित्रे गायब झाली. गेल्या १५ वर्षांत प्रथमच माने व जांभळे यांची छायाचित्रे वापरली नसल्याने स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये मोठी खळबळ उडाली. याचा संदर्भ घेऊन माने, जांभळे व वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांनी मदन कारंडे यांचे शहर अध्यक्षपद रद्द करण्याची मागणी थेट प्रदेश कार्यकारिणीकडे केली.याबाबत बोलताना कारंडे यांनी, निवेदिता माने यांचे पुत्र सत्वशील माने भाजपकडे चालले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी विरुद्ध उघडपणे मोहीम उघडली असल्याचे सांगण्यात आले. सध्या विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजत आहेत. त्यामुळे इचलकरंजी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षातील गटबाजीमधील कुरघोड्यांच्या खेळींना अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. (प्रतिनिधी)