शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प यांची अचानक उदारता कशासाठी?
2
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
3
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
4
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
5
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
6
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
7
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
8
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
9
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
10
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
11
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
12
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
13
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
14
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
15
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
16
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
17
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
18
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
19
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
20
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
Daily Top 2Weekly Top 5

शियेत क्रशर चौकात खड्डेच खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:25 IST

शिये : शिये गावातील शिये - निगवे या रहदारीच्या मार्गावर असलेल्या क्रशर चौकातील रस्त्याची सध्या प्रचंड ...

शिये : शिये गावातील शिये - निगवे या रहदारीच्या मार्गावर असलेल्या क्रशर चौकातील रस्त्याची सध्या प्रचंड दुरवस्था झाली आहे. या चौकातील रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांना मरणयातना सोसाव्या लागत आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवावेत, अशी मागणी होत आहे. दरम्यान, या रस्त्याच्या कामासाठी सुमारे दीड कोटी रुपयांची निविदा मंजूर आहे. मात्र, प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

पुणे - बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून पन्हाळा, ज्योतिबा, रत्नागिरीकडे जाण्यासाठी राज्य मार्ग १९४ सोयीचा आहे. निगवे, भुयेसह परिसरातील पंधराशे ते दोन हजार कामगार हे शिरोली औद्योगिक वसाहतीकडे याच मार्गावरून ये-जा करतात. शियेतील क्रशर चौकात मात्र रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने त्यांना रोजच खड्ड्यांचा अडथळा पार करत जावे लागते. अनेकदा खड्डे चुकविण्याच्या नादात छोटे-मोठे अपघात झाले आहेत. वाहन मागे-पुढे घेण्यावरूनही वादाचे प्रसंग घडत आहेत. त्यामुळे या मार्गावरील खड्डे बुजवावेत, अशी मागणी होत आहे.

चौकट : शियेतील शिवाजीनगर, क्रशर परिसरात रस्त्याच्या दुतर्फा असलेली गटारे पूर्णपणे बुजली आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहते. त्यामुळे रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. या परिसरात रस्त्याच्या दक्षिणेला व उत्तरेला स्टोन क्रशर आहेत. शिये - टोप येथून दगड, खडी, क्रशसॅन्ड घेऊन जाणारे डंपर, ज्योतिबा - पन्हाळा व रत्नागिरीकडे ये - जा करणारी अवजड वाहने यामुळे या रस्त्यावर मोठी वर्दळ असते. त्यामुळे या रस्त्यावरील खड्ड्यांकडे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून का दुर्लक्ष होत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कोट : क्रशर परिसरातील मुख्य रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांविषयी ग्रामपंचायतीच्यावतीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करून वाहनधारकांची गैरसोय दूर करू.

- रेखा जाधव, सरपंच, शिये

कोट : क्रशर परिसरात वाहनांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे या परिसरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवून वाहनधारकांची गैरसोय दूर करावी.

- अमर शिसाळ, वाहनधारक, शिये

कोट : क्रशर चौकातील दोनशे सत्तर मीटर लांबीच्या सिमेंटच्या रस्त्यासाठी दीड कोटी रुपयांची निविदा मंजूर असून, लवकरच या कामाची सुरुवात होईल.

- सी. एन. भोसले, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग.

....................

.....................................

फोटो ओळ :

शिये (ता. करवीर) येथील क्रशर परिसरात रस्त्यावर खड्डे पडले आहेत. (छाया - हरी बुवा)

Att