शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

पिस्तूल तस्कर मनीष नागोरी, खंडेलवालसह चौघांना डबल मोक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:19 IST

इचलकरंजी : कोल्हापुरातील कळंबा मध्यवर्ती कारागृहातील सहकारी न्यायालयीन बंदींना मोबाईल व अन्य नशेचे साहित्य पुरवठा केल्याप्रकरणी पिस्तूल तस्कर मनीष ...

इचलकरंजी : कोल्हापुरातील कळंबा मध्यवर्ती कारागृहातील सहकारी न्यायालयीन बंदींना मोबाईल व अन्य नशेचे साहित्य पुरवठा केल्याप्रकरणी पिस्तूल तस्कर मनीष नागोरी, विकास खंडेलवार या ‘विक्या-मन्या’ गॅँगच्या प्रमुखांसह चौघांवर दुसऱ्यांदा मोक्कांतर्गत (संघटित गुन्हेगारी) कारवाई करण्यात आली आहे. हा कारवाईचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी मंजुरीसाठी पाठवला होता, त्याला विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी मान्यता दिली.

विक्या ऊर्फ विकास रामवतार खंडेलवाल, शकील ऊर्फ शकलीन झाकीर गवंडी (दोघे रा. संग्राम चौक, इचलकरंजी), मन्या ऊर्फ मनीष रामविलास नागोरी (रा. यड्राव, ता. शिरोळ) व भीष्मा ऊर्फ भीमा सुभेदार चव्हाण (मूळ रा. रांजणी, ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली) अशी त्यांची नावे आहेत.

पोलिसातून मिळालेली माहिती अशी, मोक्कांतर्गत कारवाईत कारागृहात असलेले मनीष व विकास यांच्यावर नोव्हेंबर व डिसेंबर २०२० या कालावधीत इचलकरंजीतील एका सूत व्यापाऱ्याला ठार मारण्याची धमकी दिली. त्या गुन्ह्यात उच्च न्यायालयात जामिनाची प्रक्रिया चालू असून, त्यासाठी २५ हजार रुपये दे, असे सांगून पंधरा हजार रुपये खंडणी स्वरूपात उकळले. दरम्यान, त्या पैशाचे दहा मोबाइल, पाच चार्जर, पाच नग सिव्हिल, दोन पेन ड्राईव्ह व गांजा कारागृहात पुरवल्याचे निष्पन्न झाले आहे. हा कारागृहात टाकलेला मुद्देमाल कोल्हापुरात जुना राजवाडा पोलिसांनी यापूर्वीच जप्त केला आहे. गेल्याच महिन्यात विक्या-मन्या गॅँगच्या सात जणांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, मनीष व विकास यांची गुन्हेगारी संघटनेची पार्श्वभूमी पाहता, त्यांच्या गैरकृत्यांना लगाम घालण्याची आवश्यकता होती, त्याप्रमाणे त्या इचलकरंजीचे पोलीस उपअधीक्षक बाबूराव महामुनी यांनी या चौघांवर मोक्कांतर्गत कारवाईचा प्रस्ताव तयार करून पाठवला होता, त्याला मंजुरी देण्यात आली.

फोटो नं. ३००५२०२१-कोल-मनीष नागोरी (मोक्का)

फोटो नं. ३००५२०२१-कोल-विकास खंडेलवाल (मोक्का)

===Photopath===

300521\30kol_2_30052021_5.jpg

===Caption===

फोटो नं. ३००५२०२१-कोल-मनिष नागोरी (मोक्का)फोटो नं. ३००५२०२१-कोल-विकास खंडेलवाल (मोक्का)