विद्यार्थ्यांना शारीरिक सुदृढता क्रीडाशिक्षकांमुळेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:19 IST2021-05-31T04:19:20+5:302021-05-31T04:19:20+5:30

आमदार आसगावकर म्हणाले की, शारीरिक शिक्षण हा विषय पवित्र पोर्टलमध्ये समाविष्ट करण्यात यावा यासाठी प्रयत्न करू. भविष्यामध्ये क्रीडा शिक्षकांना ...

The physical fitness of the students is due to the sports teachers | विद्यार्थ्यांना शारीरिक सुदृढता क्रीडाशिक्षकांमुळेच

विद्यार्थ्यांना शारीरिक सुदृढता क्रीडाशिक्षकांमुळेच

आमदार आसगावकर म्हणाले की, शारीरिक शिक्षण हा विषय पवित्र पोर्टलमध्ये समाविष्ट करण्यात यावा यासाठी प्रयत्न करू. भविष्यामध्ये क्रीडा शिक्षकांना येणाऱ्या अडचणी साेडविण्यासाठी प्रयत्नशील राहून प्रसंगी आंदोलनही करू, असे आश्वासन त्यांनी दिले. जिल्ह्यातील शारीरिक शिक्षकांच्या विविध समस्या व अडचणी जाणून घेण्यासाठी या ऑनलाईन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. संघटनेचे राज्य अध्यक्ष शरदचंद्र धारूडकर, जिल्हा क्रीडा अधिकारी डाॅ. चंद्रशेखर साखरे यांनी मार्गदर्शन केले. स्वागत व प्रास्ताविक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष आर. डी. पाटील यांनी केले. सूत्रसंचालन महेश सूर्यवंशी यांनी केले. जिल्हा शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी क्रीडा शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. या वेळी कोल्हापूर जिल्हा व्यासपीठचे अध्यक्ष एस. डी. लाड, एस. व्ही. सूर्यवंशी, पदाधिकारी डी. एस. घुगरे, प्रदीप साळोखे, संपत सावंत, शरद तावदारे, संदीप पाटील, संताजी भोसले, वैशाली पाटील, ए. एस. रामाणे, आर. बी. पाटील, दिलीप राऊत, विनादे पाटील, आर. एस. पाटील, राजेंद्र सूर्यवंशी यांच्यासह शेकडो क्रीडा शिक्षक या ऑनलाईन बैठकीत सहभागी झाले होते.

Web Title: The physical fitness of the students is due to the sports teachers