शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल, डिझेल शंभर पार, मोदी बस्स करा जनतेची लुटमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:29 IST

कोल्हापूर : ‘पेट्रोल, डिझेल शंभर पार, मोदी बस्स करा जनतेची लुटमार’, ‘मोदी सरकारचा धिक्कार असो’, अशा घोषणा देत ...

कोल्हापूर : ‘पेट्रोल, डिझेल शंभर पार, मोदी बस्स करा जनतेची लुटमार’, ‘मोदी सरकारचा धिक्कार असो’, अशा घोषणा देत कोल्हापुरात सोमवारी काॅंग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारने केलेल्या इंधन दरवाढीचा निषेध केला. गॅस, पेट्रोल, डिझेलची दरवाढ कमी होईपर्यंत विविध टप्प्यांमध्ये तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार यावेळी काॅंग्रेसकडून करण्यात आला.

केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे महागाई वाढली आहे. या महागाईविरोधात अखिल भारतीय काॅंग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार, राज्यभर आंदोलन सुरू आहे. याअंतर्गत कोल्हापुरातील काॅंग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आमदार ऋतुराज पाटील, चंद्रकांत जाधव, जयंत आसगावकर आणि जिल्हा काॅंग्रेसचे प्रभारी निरीक्षक संजय बालुगडे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी कोल्हापूर जिल्हा व शहर काॅंग्रेस कमिटीच्या प्रवेशव्दारात निदर्शने केली. बालुगडे यांनी आंदोलनात टांगा सहभागी करून महागाईचा निषेध केला. यावेळी निषेधाचे फलक हातात घेऊन कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या. या आंदोलनात काॅंग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, गुलाबराव घोरपडे, सचिन चव्हाण, बाळासाहेब सरनाईक, संजय पोवार-वाईकर, तौफिक मुल्लाणी, संध्या घोटणे, सुलोचना नाईकवडे, सरलाताई पाटील, लीला धुमाळ, हेमलता माने, संजय मोहिते, संपतराव चव्हाण, दीपक थोरात, प्रवीण पाटील, प्रशांत गणेशाचार्य, आनंदा करपे, वैभव देसाई, आदी सहभागी झाले होते. दरम्यान, महागाईविरोधात तालुकापातळीवर सायकल रॅली, चूल पेटवून निषेध करणारे आंदोलन करण्यात येत असल्याचे संजय पोवार-वाईकर यांनी सांगितले.

फोटो (१२०७२०२१-कोल-काॅंग्रेस निर्दशने ०१, ०२) : कोल्हापुरात सोमवारी काॅंग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आमदार ऋतुराज पाटील, चंद्रकांत जाधव, जयंत आसगावकर आणि जिल्हा काॅंग्रेसचे प्रभारी निरीक्षक संजय बालुगडे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्हा व शहर काॅंग्रेस कमिटीच्या प्रवेशव्दारात निदर्शने केली. (छाया : नसीर अत्तार)

120721\12kol_2_12072021_5.jpg~120721\12kol_3_12072021_5.jpg

फोटो (१२०७२०२१-कोल-कॉंग्रेस निर्दशने ०१, ०२) : कोल्हापुरात सोमवारी कॉंग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आमदार ऋतुराज पाटील, चंद्रकांत जाधव, जयंत आसगांवकर आणि जिल्हा कॉंग्रेसचे प्रभारी निरीक्षक संजय बालुगडे यांच्या नेतृत्वाखाली  कोल्हापूर जिल्हा व शहर कॉंग्रेस कमिटीच्या प्रवेशव्दारात निदर्शने केली. (छाया : नसीर अत्तार)~फोटो (१२०७२०२१-कोल-कॉंग्रेस निर्दशने ०१, ०२) : कोल्हापुरात सोमवारी कॉंग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आमदार ऋतुराज पाटील, चंद्रकांत जाधव, जयंत आसगांवकर आणि जिल्हा कॉंग्रेसचे प्रभारी निरीक्षक संजय बालुगडे यांच्या नेतृत्वाखाली  कोल्हापूर जिल्हा व शहर कॉंग्रेस कमिटीच्या प्रवेशव्दारात निदर्शने केली. (छाया : नसीर अत्तार)