शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
2
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
3
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
4
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
5
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
6
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
7
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
8
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
9
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
10
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
11
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
12
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
13
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
14
रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी १५ आरोपींवर आरोपपत्र दाखल; २ मुख्य आरोपी अद्यापही फरार
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

टाकाळा खणीत कचऱ्याला विरोध, हायकोर्टात याचिका

By admin | Updated: December 9, 2014 23:54 IST

कचऱ्याचा प्रश्न : ११ तारखेला सुनावणी

कोल्हापूर : टाकाळा खणीत कचरा टाकण्यास विरोध करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. याबाबत न्यायालयात गुरुवारी (दि. ११) सुनावणी होणार आहे. टाकाळा खणीकडे शहराची कचऱ्याच्या प्रश्नातून मुक्तीकडे एक पाऊल म्हणून पाहिले जात; पण टाकाळा खणीत कचरा टाकण्यास न्यायालयाकडून मज्जाव झाल्यास शहरातील कचऱ्याचा प्रश्न गंभीर होणार आहे.सध्या शहरातील कचरा टाकायचा कुठे, हा प्रशासकीय यंत्रणेसमोरील मोठा प्रश्न आहे. कचरा उठावाची मोठी यंत्रणा मनपाकडे आहे. झूम प्रकल्पात क्षमतेच्या चारपट कचरा टाकला आहे. कचरा टाकण्यासाठी दुसरी जागाच नसल्याने कचरा-कोंडाळे वाहत आहेत. टाकाळा खणीत झूममधील कचरा हटविल्यानंतर याठिकाणी कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प उभा केला जाणार आहे. मात्र, टाकाळा खण कचरा टाकण्यास योग्य पद्धतीने तयार होण्यास अद्याप काही कालावधी लागणार आहे. त्यामुळे मार्च २०१५नंतरच शहरातील कचरा शास्त्रीय पद्धतीने निराकरण होण्यास सुरुवात होणार आहे. राजारामपुरी परिसरातील टाकाळा खणीत ‘लँडफिल्ड साईट डेव्हलपिंग’ (कचरा टाकण्याची शास्त्रीय जागा) तयार करण्याचे काम सुरू आहे. झूम प्रकल्पातील कचऱ्याची चाळण करून राहिलेल्या कचऱ्याचे घटक (इनर्ट मटेरिअल) महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या निकषांनुसारच या खणीत टाकले जाणार आहेत. खणीचे काम मार्चअखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. मात्र, टाकाळा खणीशेजारी शाळा, हॉस्पिटल व लोकवस्ती असल्याने हा प्रकल्प रद्द करण्याचे आदेश व्हावेत, अशी मागणी करणारी याचिका परिसरातील नागरिकांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. टाकाळा खणीबाबत न्यायालयात सकारात्मक निर्णय न झाल्यास महापालिकेसमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)