शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीच्या मैदानात तरुणाईचा टक्का वाढला

By admin | Updated: October 9, 2014 00:46 IST

विधानसभा : पन्नाशीच्या आतील सुमारे ९८ उमेदवार; युती, आघाडीतील बिघाडीने मिळाली संधी

संतोष मिठारी-- कोल्हापूर -स्वबळावर लढण्याच्या भूमिकेतून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि शिवसेना-भाजप युती तुटल्याने विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत संभ्रमावस्था असल्याचे चित्र आहे. मात्र, आघाडी आणि युतीमध्ये झालेली बिघाडी तरुणाईच्या पथ्यावर पडली आहे. यंदाच्या निवडणुकीत उमेदवारीमध्ये तरुणाईचा टक्का वाढला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील दहा मतदारसंघांतून ५० वर्षांच्या आतील सुमारे ९८ युवा उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. आघाडी असो की युती; यांच्याकडून आतापर्यंत मतदारसंघात दबदबा असलेले ज्येष्ठ, वयस्कर आणि अनुभवी नेतृत्वाला उमेदवारीबाबत प्राधान्य होते. तरुणांना अधिकतम संधी मिळत नव्हती. त्यामुळे संघटनकौशल्य, संपर्क असूनही अनेक तरुण चेहऱ्यांना प्रचारयंत्रणेत काम करावे लागत होते. मात्र, या वर्षीच्या निवडणुकीत हे चित्र बदलले. आघाडी, युतीची स्वबळावर लढण्याची भूमिका तरुणाईच्या पथ्यावर पडली. निवडणुकीच्या रणांगणातील पक्षांची संख्या वाढल्याने त्यांना उमेदवारांची शोधाशोध करावी लागली. यात काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, मनसे, भाकप या पक्षांनी तरुण चेहऱ्यांना उमेदवारी देण्यावर भर दिला. बंडखोर, अपक्ष म्हणूनही मैदानात उतरलेले अधिकतम तरुणच आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील निवडणुकीत २०८ जणांनी उमेदवारी अर्ज भरले होते. त्यापैकी ८७ जणांनी माघार घेतल्याने १२१ जण रिंगणात असून त्यापैकी सुमारे ९७ उमेदवारांचे वय हे ५० वर्षांच्या आतील आहे. कागल वगळता चंदगड, कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर उत्तर, हातकणंगले, इचलकरंजी, राधानगरी, करवीर, शाहूवाडी, शिरोळ मतदारसंघांत ९० टक्के उमेदवार तरुण आहेत. लोकसभा निवडणुकीतील नवमतदारांची भूमिका लक्षात घेऊन संबंधित पक्षांनी तरुणांना उमेदवारी देऊन नवमतदारांना ‘कॅच’ करण्याचा उद्देश साधण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, त्याला कितपत यश मिळणार हे १९ आॅक्टोबर रोजी समजणार आहे.