शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
4
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
5
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
6
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
7
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
8
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
9
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
10
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
11
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
12
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
13
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
14
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
15
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
16
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
17
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
18
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
19
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
20
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
Daily Top 2Weekly Top 5

पेन्शन प्रकरणे १ सप्टेंबरपासून आॅनलाईन होणार

By admin | Updated: August 26, 2015 00:38 IST

मीनाक्षी मिश्रा : आता एकच अर्ज नमुना भरावा लागणार; कर्मचाऱ्यांची वेळ व श्रम यांची बचत होणार

कोल्हापूर : १ सप्टेंबरपासून शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांची पेन्शन प्रकरणे आॅनलाईन होणार आहेत. पूर्र्वी पेन्शनसाठी वेगवेगळ्या पाच ते सहा अर्जांचे नमुने भरावे लागत होते. आॅनलाईन प्रणालीमध्ये आता एकच अर्ज नमुना भरावा लागणार आहे. हा अर्ज जबाबदारीने व काळजीपूर्वक भरा, वित्तीय अनियमितता घडू नये यासाठी दक्ष रहा, असे प्रतिपादन राज्याच्या प्रधान महालेखाकार मीनाक्षी मिश्रा यांनी मंगळवारी केले. प्रधान महालेखाकार मुंबई आणि लेखा व कोषागारे विभाग यांच्यातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात ‘पेन्शन’ या विषयावरील कार्यशाळा घेण्यात आली. यामध्ये मिश्रा यांनी पेन्शन अर्ज आॅनलाईन भरण्यासंबंधी कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार, उपमहालेखाकार नीलेश पाटील, जिल्हा कोषागार अधिकारी रमेश लिधडे, जिल्हा परिषदेचे मुख्य लेखाधिकारी गणेश देशपांडे, लेखाधिकारी शेंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.मिश्रा म्हणाल्या, पेन्शन प्रकरणे आॅनलाईन होणार असल्याने शासकीय कार्यालये तसेच सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या वेळेची अणि श्रमांची बचत होण्यास मदत होणार आहे. आजचा कर्मचारी हा भविष्यात पेन्शनधारक आहे, याचे भान ठेवून शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पेन्शन प्रकरणे काळजीपूर्वक आणि जबाबदारीने हाताळली पाहिजेत. सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला निवृत्तीच्या दुसऱ्या महिन्यांपासून पेन्शन मिळणे आवश्यक आहे; पण तरीही पेन्शन उशिरा मिळण्याची अनेक प्रकरणे जिल्ह्यामध्ये आढळून येत आहेत. त्यामुळे ही कार्यशाळा आयोजित केल्याचे मिश्रा यांनी सांगितले. अप्पर जिल्हा कोषागार अधिकारी वर्षा परीट यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. नीलेश पाटील यांनी आभार मानले. प्रकरणे मार्र्गी लावा पेन्शन प्रशिक्षण कार्यशाळा व पेन्शन अदालत या दोन्ही बाबी महत्त्वाच्या आहेत. कोणत्याही सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला पेन्शन अदालतीमध्ये जावे लागू नये या पद्धतीने काम करा. शासनाच्या नियमानुसार कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीपूर्र्वी सहा महिने पेन्शनसंदर्भातील सर्व प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यामुळे नियमानुसार काम करून पेन्शन प्रकरणे वेळेवरच मार्र्गी लावावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी केली.