शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

पन्हाळा-पावनखिंड मोहीम आता माहितीपूर्ण

By admin | Updated: June 16, 2017 00:47 IST

जिल्हा नियोजन मंडळ : सात लाखांचा निधी; १६० फलक, मैलाचे दगड उभारण्याचे काम सुरू

समीर देशपांडे । लोकमत न्यूज नेटवर्क---कोल्हापूर : महाराष्ट्र, कर्नाटक, गोव्यासह अनेक राज्यांतील युवा पिढीला ‘मान्सून ट्रेकिंग’चे वेड लावणारी पन्हाळा-पावनखिंड मोहीम आता आणखी माहितीपूर्ण आणि दिशादर्शक होणार आहे. पन्हाळ्याच्या राजदिंडीपासून ते पाताळदरा इथंपर्यंत या परिसरातील ऐतिहासिक माहिती मोजक्या शब्दांत देणारे आणि दिशा दर्शविणारे १६० फलक लावण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. यासाठी जिल्हा नियोजन मंडळातून सात लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. गेली ४० वर्षे ही मोहीम राबविली जाते. अशातच गेल्या दहा वर्षांमध्ये पन्हाळा-पावनखिंड मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळू लागला आहे. मैत्रेय, सह्याद्री प्रतिष्ठान, हिलरायडर्स, शिवराष्ट्र, निसर्गवेध, पोवार तालीम यांच्यावतीने दरवर्षी या मोहिमेचे आयोजन करण्यात येते. प्रामुख्याने जुलै, आॅगस्टमध्ये होणाऱ्या या मोहिमांमध्ये आता महाराष्ट्रासह अन्य राज्यांतूनही तरुण-तरुणी सहभागी होत आहेत. वरून कोसळणारा धो-धो पाऊस आणि पायाखालची निसरडी वाट यातून ही मोहीम पूर्ण करताना येणारा चित्तथरारक अनुभव अविस्मरणीय ठरतो. छत्रपती शिवाजी महाराज यांचे अतुलनीय धाडस बाजीप्रभू, फुलाजी प्रभू देशपांडे आणि वीर शिवा काशीद यांच्या बलिदानाची कथा ऐकताना मोहिमेमधील उपस्थितांच्या अंगावर काटा उभा राहतो. या मार्गाची लोकप्रियता वाढत असताना हा मार्ग अधिकृत ठरावा, कुणीही यावं आणि कुठूनही जावं असं न होता त्याला एक शिस्त यावी यासाठी ही फलक संकल्पना राबविण्यात येत आहे. पन्हाळ्यावरील राजदिंडीपासून हे फलक लावण्यास सुरुवात होईल. या ठिकाणी मोठा (पान ४ वर)इतिहास डोळ्यांसमोर उभा राहिला पाहिजेया मार्गांने जाणाऱ्यांच्या डोळ्यांसमोर इतिहास उभा राहिला पाहिजे ही या योजनेमागची भूमिका आहे. सन १९८७ पासून माझी ही कल्पना होती; परंतु ती आता प्रत्यक्षात येत आहे. आपल्या रयतेसाठी जिवावर उदार होणारा राजा आणि त्या राजासाठी बलिदान देणारे निष्ठावंत मावळे यांची स्मृती जागविणारी ही मोहीम आहे. ती माहितीपूर्ण व्हावी यासाठी ही योजना पूरक काम करेल. - डॉ. अमर आडके, इतिहास अभ्यासक‘जीआरसी’मध्ये कामहे दिशादर्शक फलक उभारण्यासाठी काचपूडमिश्रित काँक्र ीट वापरण्यात आले आहे. त्यामुळे किमान १०० वर्षे हे फलक, दगड टिकतील, असे सांगितले जाते. जाणीवपूर्वक या वेगळ्या मटेरियलमध्ये हे काम करण्यात येत आहे. पूर्ण नंदी हवास्वराज्यावरील आक्रमणावेळी पन्हाळ्याच्या पायथ्याला असलेला नंदी फुटला आणि ठिकाणाला ‘फुटका नंदी’ असे संबोधले जाऊ लागले; परंतु या ठिकाणी आता चांगला, पूर्णाकृती नंदी उभारून ‘फुटका नंदी’ ही ओळख पुसणे आवश्यक आहे.