पंचायत राज समितीचा नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये दौरा शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:27 IST2021-09-22T04:27:57+5:302021-09-22T04:27:57+5:30

संभाव्य नावांच्या यादीमध्ये ठाणे, सिंधुदुर्ग, पुणे, सांगली, औरंगाबाद, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, बुलडाणा, अकोला, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, सातारा, कोल्हापूर आणि ...

Panchayat Raj Samiti to visit in November, December | पंचायत राज समितीचा नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये दौरा शक्य

पंचायत राज समितीचा नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये दौरा शक्य

संभाव्य नावांच्या यादीमध्ये ठाणे, सिंधुदुर्ग, पुणे, सांगली, औरंगाबाद, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, बुलडाणा, अकोला, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्हा परिषदांची नावे आहेत. या जिल्हा परिषदांना सन २०१५/१६ आणि सन २०१६/१७ च्या लेखापरीक्षा पुनर्विलोकन अहवाल तसेच सन २०१७/१८ च्या वार्षिक प्रशासन अहवालाच्या संदर्भात नोव्हेंबर, डिसेंबर २०२१ मध्ये भेट देण्याचे नियोजन आहे.

विधानमंडळाच्या उपसचिवांनी प्रधान सचिवांंसह जिल्हा परिषदांना याबाबत अवगत केले असून, पाच प्रतीत संबंधित अहवाल पाठवण्यास सांगण्यात आले आहे. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बैठकांबाबत सूचना देण्यात आल्या असून, कार्यक्रम निश्चित झाल्यानंतर कळवण्यात येणार असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

Web Title: Panchayat Raj Samiti to visit in November, December