पंधरा दिवसाच्या विश्रांतीनंतर कोल्हापुरात पावसाने दमदार पुनरागमन केले आहे. डोंगरी तालुक्यासह पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. भोगावती नदी दुसऱ्यांदा पात्राबाहेर पडली आहे, तर १२ बंधारे पाण्याखाली ...
स्थापना होऊन पावणेदोन वर्षे झाली, तरी आश्वासनांपुढे कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाचे काम सरकलेले नाही. अपेक्षित गतीने बांधकाम परवाने मिळत नसल्याने ग्रामीण आणि शहरातील भागांतील नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. ...
महापुराने शिरोळ, हातकणंगले, करवीर तालुके जलमय झाले होते. रस्ते पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते.भविष्यातही पुराचे संकट नाकारता येत नाही. पूरग्रस्त भागातील नागरिकांचे जीवन सुरक्षित राहण्यासाठी येथे उड्डाणपूलांचे जाळे तयार करण्याच्या हालचा ...
पर्यावरण जनजागृतीचा भाग म्हणून ३२ वर्षांपूर्वी कोल्हापुरातील रंकाळा तलाव प्रदूषित न करण्याची चळवळ सुरू करणारे शाहीर राजू राऊत हे आपल्या घरी गेल्या २२ वर्षांपासून एकाच छोट्या गणेशाची प्रतिष्ठापना करत आले आहेत. कलाकाराच्या घरातून गणेशाचे विसर्जन करणे म ...
दीड दिवसाचा पाहुणा म्हणून आलेल्या गणपतीबाप्पांना भाविकांनी निरोप दिला. आपल्या आगमनाने सोमवारी (दि. २) घरदार उजळवून टाकलेल्या बाप्पांना लगेच दुसऱ्या दिवशी निरोप देताना आपसूकच गणेशभक्तांचे अंत:करण जड झाले. या वर्षीच्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विसर्जनाच ...
कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३२, बिंदू चौक या प्रभागातील प्रमुख रहदारी व वर्दळीच्या असणाऱ्या रस्त्यांच्या बाजूपट्टी करण्याचे काम मंगळवारपासून सुरू झाले; यासाठी सुमारे २५ लाखांचा निधी तत्कालीन आयुक्त अभिजित चौधरी यांनी उपलब्ध करून दिला हो ...
कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी होण्याकरिता नवीन वर्षापर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. राज्य सरकारनेही यासंदर्भात महापालिका प्रशासनाकडे माहिती मागविली असल्यामुळे अंतिम निर्णय होईपर्यंत किमान चार महिन्यांचा अवधी जाईल. ...
काँग्रेसबध्दल सर्वसामान्यांच्या मनांत नाराजीची भावना असली तरी आता चक्क कोल्हापूरच्या जिल्हाध्यक्षांनाच पक्षाचे ‘हात’ हे चिन्ह नको झाले आहे. त्यामुळे ते यावेळेची विधानसभा निवडणूक चक्क अपक्ष म्हणून लढवणार आहेत. ...
राधानगरी रोड वरील इराणी खणीनजीकच्या चौकात उभारण्यात आलेल्या हातात तलवार धरलेल्या सरसेनापती संताजी घोरपडे स्मृती स्तंभाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज होते. ...