शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
3
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
4
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
5
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
6
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
7
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
8
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
9
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
10
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
11
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
12
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
18
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
19
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
20
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

पडसाळी तलाव व मुडागड पर्यटन स्थळ व्हावे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:00 IST

रवींद्र पाटील लोकमत न्यूज नेटवर्क बाजारभोगाव : तळकोकणातून सुसाट वेगाने अंगावर येणारा थंडगार वारा... धुक्यात हरवलेले तळ कोकण, हिरवाईचा ...

रवींद्र पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

बाजारभोगाव : तळकोकणातून सुसाट वेगाने अंगावर येणारा थंडगार वारा... धुक्यात हरवलेले तळ कोकण, हिरवाईचा शालू नेसून नव्या नवरीवाणी सजलेल्या पर्वतरांगा, सोबतीला कारवी पक्ष्यांचा चिवचिवाट, कमालीची शांतता असं नयनरम्य दृश्य पडसाळी घाटमाथ्यावर अनुभवयास मिळत आहे. परंतु लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा परिसर पर्यटनदृष्ट्या पोरका राहिला आहे .

पन्हाळा पश्चिम भागाच्या शेवटच्या टोकाला पडसाळी गाव आहे. गावापासून दीड किलोमीटर अंतर पायी चालत गेल्यावर घाटमाथा पाहायला मिळतो. दूरवर पसरलेल्या तळकोकणचे नयनरम्य दृश्य डोळ्यांमध्ये साठवताना एक वेगळाच आनंद मिळतो. हिरव्यागार झाडी-झुडपातून घाटमाथ्यावरून कोकणाकडे गेलेली पायवाट, हिरवीगार शिवार, डोंगरमाथ्यावर फिरणारा जनावरांचा गोतावळा जणू स्वर्ग असल्याची अनुभूती देतो.

सह्याद्रीचा भक्कम बुरुज म्हणून ओळखला जाणारा, शिवशाही जिवंत ठेवणारा किल्ले मुडागड. कोल्हापूरपासून अवघ्या ६० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कोलिक व कोदे (ता. गगनबावडा) यांच्या डोंगरातील मध्यभागाच्या हद्दीवर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी कोकण विभागावर नजर ठेवण्यासाठी कोलिक कोदे हद्दीवर गड बांधण्याचे निश्चित केले होते. त्यानुसार त्यांनी गडाच्या पायाचे बांधकाम रचण्यास सुरुवात केली होती. मात्र काही कारणास्तव गडाचे बांधकाम अर्धवट सोडून देण्यात आले आहे. काळाच्या ओघात दगडाचे दगडी अवशेष पर्यटकांना पाहता येतात.

सह्याद्रीच्या रांगांनी व्यापलेल्या या परिसरात सामावलेला पडसाळी लघू पाटबंधारे तलाव या तालुक्याच्या विकासाला चालना देणारा आहे. या जंगलाच्या शेवटच्या टोकाला कोकण किनारपट्टी सुरू होते. जंगल आणि किनारपट्टी हे एका दरीत विभागलेले आहेत. या घाटमाथ्यावरून तळकोकणातील दिसणारे निसर्गसौंदर्य पर्यटकांना भूरळ घालणारे आहे .

चौकटः

संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून पडसाळी घाटमाथ्यावर वनखात्याने मनोरे उभारावेत. जेणेकरून पक्षी व वन्यजिवांचे पर्यटकांना दर्शन घेता येईल. निवासस्थाने उभारण्यासाठी प्रयत्न करावेत. यातून स्थानिकांना रोजगार मिळेल.

प्रकाश पाटील, कोलीक पैकी चाफेवाडी. सामाजिक कार्यकर्ते

फोटो ओळः

मुडागडचे अर्धवट बांधकाम झाल्याचे दगडी अवशेष आढळते.