शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
6
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
7
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
8
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
9
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
10
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
11
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
12
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
13
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
14
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
15
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
16
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
17
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
18
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
19
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
20
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
Daily Top 2Weekly Top 5

कडधान्यांचा अनुशेष भरण्यासाठी ‘पॅकेज’

By admin | Updated: July 3, 2015 01:18 IST

मोफत बियाणे : कोल्हापूरसह राज्यातील सात जिल्ह्यांची निवड, बांधावर तूर लागवडीस प्रोत्साहन

भीमगोंडा देसाई - कोल्हापूरराष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत कडधान्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी कोल्हापूरसह राज्यातील आठ जिल्ह्यांत बांधावर तुरीच्या लागवडीस प्रोत्साहन दिले जात आहे. यासाठी शेतकऱ्यांना बियाण्यांचे मोफत पॅकेज दिले जात आहे. आठ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना ३७५ क्विंटल तूर बियाणे कृषी विभागातर्फे मोफत दिले जात आहे. याअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात पाच हजार हेक्टरवर तूर लागवडीचे उद्दिष्ट आहे. आंतर पीक म्हणून तूर बियाणे घेतल्यास शेकऱ्यांना फायदा होऊ शकतो, असे कृषी प्रशासनाचे म्हणणे आहे. पश्चिम महाराष्ट्रात मुख्य पीक ऊस आहे. सलग ऊस लागवड होत असल्यामुळे बांधही मोठे नसतात. त्यामुळे कडधान्याचे उत्पादन राज्यात पश्चिम महाराष्ट्रात कमी होते. ते वाढावे म्हणून बांधावरील तूर लागवडीस प्रोत्साहन दिले जात आहे.संयुक्त राष्ट्र संघटनेने २०१६ हे ‘आंतरराष्ट्रीय कडधान्य वर्ष’ म्हणून घोषित केले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने चालू खरीप हंगामासाठी आंतरर पीक म्हणून कडधान्याचे अधिक उत्पादन घेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. कडधान्याचे उत्पादन कमी होणाऱ्या आठ जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्या जिल्ह्यात भात व अन्य पिकांच्या बांधावर तूर पीक घ्यावे, असे आवाहन शेतकऱ्यांना केले आहे. बांधावर तूर टोकण करण्यासाठी एक हेक्टरसाठी एक किलो बी.एस.एम.आर. ७३६ जातीचे बियाणे, असे प्रमाण कृषी प्रशासनाने निर्धारित केले आहे.बियाणे वाटप सुलभ व्हावे, म्हणून २५० ग्रॅमचे एक पाकीट आहे. कोरडवाहू आणि बागायत क्षेत्रांसाठी तूर फायदेशीर आहे. तिची रोगप्रतिकारक क्षमता चांगली आहे. जास्तीज जास्त शेतकऱ्यांपर्यंत बियाणे पोहोचविण्याचा प्रयत्न कृषी विभाग करीत आहे. बांधावर तूर लागवड केल्याने शेतातील उत्पन्नाबरोबरच बोनस उत्पन्न मिळणार आहे. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.जिल्ह्यातील उद्दिष्टतालुकानिहाय तूर बियाणांचे वाटप क्विंटलमध्ये असे : हातकणंगले-५० किलो, पन्हाळा-५, शाहूवाडी-७, राधानगरी-६, गगनबावडा-१, करवीर-४, कागल-४, गडहिंग्लज- ४.५०, भुदरगड- ६, आजरा-५, चंदडग-७.जिल्ह्यातील उद्दिष्टतालुकानिहाय तूर बियाणांचे वाटप क्विंटलमध्ये असे : हातकणंगले-५० किलो, पन्हाळा-५, शाहूवाडी-७, राधानगरी-६, गगनबावडा-१, करवीर-४, कागल-४, गडहिंग्लज- ४.५०, भुदरगड- ६, आजरा-५, चंदडग-७.बांधावर तुरीची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना मोफत बियाणे दिले जात आहे. ज्या शेतकऱ्यांना तुरीचे बियाणे आवश्यक आहे, त्यांनी जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा.- मोहन आटोळे,जिल्हा कृषी अधीक्षक