शहरं
Join us  
Trending Stories
1
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
2
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
3
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
4
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
5
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
6
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
7
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
8
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
9
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
10
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
11
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
12
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
13
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
14
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
15
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
16
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
17
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
18
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

‘खाकी’ची दुसऱ्या लाटेत कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : रस्त्यावर अविरत कर्तव्य निभावत सर्वसामान्यांना सुरक्षा देणाऱ्या पोलिसांनी व्यायाम, प्राणायम, संत्री-मोसंबी यांचे ज्यूस, अंडी, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : रस्त्यावर अविरत कर्तव्य निभावत सर्वसामान्यांना सुरक्षा देणाऱ्या पोलिसांनी व्यायाम, प्राणायम, संत्री-मोसंबी यांचे ज्यूस, अंडी, मांसाहारी पदार्थासह हिरव्या भाज्या, फळे यांचा आहारात समावेश केल्याने त्यांच्या रोगप्रतिकारकशक्तीमध्ये वाढ झाली. परिणामी, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बाधित पोलिसांची संख्या घसरली. अवघे ८२ पोलीस अधिकारी व कर्मचारी बाधित झाले.

कोरोना संसर्गात पोलिसांना ‘फ्रंट वॉरिअर्स’ म्हणून संबोधले. पहिल्या लाटेत सुमारे तीन हजार पोलिसांपैकी ३५८ जणांना बाधा झाली. दोघा कर्मचाऱ्यांचा जीव गेला. तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पोलीस व त्यांच्या कुटुंबासाठी विशेष काळजी घेत स्वतंत्र कोविड सेंटर सुरू करून पोलिसांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले. दुसऱ्या लाटेत पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनीही पोलिसांची काळजी घेत त्यांना व्यायामाचे महत्त्व पटवून प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी प्रयत्न केले. जास्तीत जास्त पोलिसांचेही लसीकरण केले. परिणामी दुसऱ्या लाटेत अवघे ८२ पोलिसांना बाधा झाली. सध्याच्या स्थितीत ९८ टक्के पोलिसांचे लसीकरण पूर्ण झाले. कुटुंबातील व्यक्ती पॉझिटिव्ह येताना पोलिसांचे अहवाल मात्र निगेटिव्ह आल्याची सकारात्मक बाजू असल्याचे अधीक्षक बलकवडे यांनी सांगितले.

प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी...

रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी पोलिसांकडून रोज व्यायाम, चालणे, प्राणायम, योगासह फळे, हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश केला जात आहे. पौष्टिक व प्रोटीनयुक्त आहारावर भर दिला जात आहे. ड्यूटीवर असलेल्या पोलिसांचे मानसिक आरोग्य सक्षम ठेवण्यासाठी समुपदेशन केले जात होते.

कोट..

पहिल्या लाटेतून कोरोनामुक्त झाल्यानंतर नियमित व्यायाम, सकस आहाराबरोबरच ड्यूटीच्या ठिकाणी पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेला मानसिक आधार, घरीचे वातावरण हे रोगप्रतिकाकशक्ती वाढविण्यास कारणीभूत ठरले. कोरोनामुक्तीसाठी मानसिकदृष्ट्या सक्षम असणे महत्त्वाचे आहे.

- विजय कारंडे, पोलीस हवालदार.

कोट...

कोरोनाची भीती बाळगू नये, मनातून धास्ती काढून टाकली पाहिजे. योग्य आहार, नियमित व्यायाम तसेच सकारात्मक विचार हे रोगप्रतिकारकशक्ती वाढीस कारणीभूत ठरले आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचाही मोठा फायदा झाला आहे.

- रणजीत देसाई, पोलीस नाईक.

कोट..

कोरोनामुक्तीनंतर महिनाभर त्रास झाला; पण त्यानंतर व्यायाम, चालणे, योगासने केली. तणावमुक्त राहण्यासाठी सकारात्मक विचारसरणी अंगीकरणे आवश्यक आहे. सकस आहारासह ड्रायफूडसवरही भर दिला. त्यामुळे आज पुन्हा बंदोबस्तासाठी तंदुरुस्त झालो.

- सलीम शेख, पोलीस हेड कॉन्स्टेबल.

कोट...

दुसऱ्या लाटेत जास्तीत जास्त पोलिसांच्या लसीकरणासह त्यांच्या व्यायामावर भर दिला. त्यामुळे बाधित पोलिसांची संख्या कमी झाली. त्याशिवाय त्यांच्यात सकारात्मक वृत्ती वाढविण्यास मदत केली. इतर रुग्णसंख्या वाढताना कर्तव्यावरील पोलीस बाधित होण्यापासून अलिप्त राहिले.

- शैलेश बलकवडे, पोलीस अधीक्षक, कोल्हापूर

पॉइंटर...

पहिली लाट...

- एकूण कोरोनाबाधित : ४९५२७

- मृत्यू : १७०५

- पोलीस : ३५८

- मृत्यू : ०२

दुसरी लाट...

- एकूण कोरोनाबाधित : ४५०७६

- मृत्यू : १५६५

-पोलीस : ८२

- मृत्यू : ००