शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

थकबाकीपोटी मनपा, जि.प.च्या निधीला ब्रेक

By admin | Updated: February 24, 2015 00:45 IST

जीवन प्राधिकरण आक्रमक : २७० कोटींच्या वसुलीसाठी कडक पावले

राजाराम लोंढे - कोल्हापूर - महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने (एमजीपी) थकबाकीपोटी जिल्हा परिषद, महापालिकेसह जिल्ह्यातील नगरपालिकांची नाकाबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थांकडे तब्बल २७० कोटी ७३ लाख २० हजार रुपयांची थकबाकी आहे, ही थकबाकी भरण्यासाठी प्राधिकरणाने गेले सहा वर्षे सवलतीची ‘निर्भय’ योजना आणली, पण त्याला वाटाण्याच्या अक्षता दिल्या. निर्भय योजनेला मुदतवाढ देऊन या संस्थांना थकबाकी भरण्याची शेवटची संधी दिली असून या काळात थकबाकी भरली नाही तर शासनाकडून येणारा सर्व निधी रोखला जाणार आहे. पूर्वी महापालिका, नगरपालिकांसह ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजना या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून राबविल्या जात होत्या. आता ग्रामपंचायतीच्या योजना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविण्यास सुरुवात झाल्याने जीवन प्राधिकरणाची अवस्था असून, अडचण आणि नसून खोळंबा, अशी झाली आहे. जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिकांनी पाणीपुरवठा योजना स्वत:कडे घेतल्या, पण प्राधिकरणाची थकबाकी दिलेली नाही. त्यामुळे हा विभाग अखेरची घटका मोजत आहे. या विभागातील अनेक अधिकारी जिल्हा परिषद, महापालिकामध्ये प्रतिनियुक्तीवर काम करत आहेत. मुद्दलीवरील व्याज व दंडव्याजामुळे थकबाकीचा आकडा वर्षाला फुगत चालला आहे, पण रक्कम आवाक्याबाहेरची असल्याने थकबाकीचा प्रश्न भिजत पडला आहे. जीवन प्राधिकरणाने दट्या लावल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांनी थकबाकीत सवलत मागितली होती. त्यानुसार जीवन प्राधिकरणाने २००८ व २०१० ला निर्भय योजना आणली. १०० टक्के विलंब आकार, दंडनीय व्याजात सवलत देण्याचा प्रस्ताव होता, पण याला प्रतिसाद मिळाला नाही थकबाकी वसूल होत नसल्याने प्राधिकरणाचे कामकाज कसे चालवायचे असा पेच अधिकाऱ्यांसमोर होता. त्यामुळे शासनाने कारवाई करण्यास मान्यता दिली असून शेवटची संधी म्हणून सुधारित निर्भय योजना लागू केली आहे. ३१ जुलैपर्यंत या योजनेचा कालावधी असून या योजनेचा लाभ घेत थकबाकी भरली नाही तर संबंधित थकीत संस्थांचे सर्व निधी रोखले जाणार आहेत. गेले अनेक वर्षे स्थानिक स्वराज्य संस्थांकडे थकबाकी आहे. वसुलीसाठी अनेक वेळा प्रयत्न करुनही प्रतिसाद मिळाला नाही. आता या संस्थांना थकबाकीत सवलतीची शेवटची संधी आहे. त्यांनी पैसे भरून सहकार्य करावे. - एस. एस. शिंदे (कार्यकारी अभियंता) अशी आहे थकबाकीकोल्हापूर महापालिका- १२३ कोटी १३ लाख ३४ हजार इचलकरंजी नगरपालिका-२० लाख ७१ हजार कुरुंदवाड नगरपालिका- ३६ लाख ६६ हजार गडहिंग्लज नगरपालिका-१० लाख ९१ हजारजयसिंगपूर नगरपालिका -३४ लाख ५१ हजार कागल नगरपालिका - ३ लाख ४८ हजार जिल्हा परिषद - १५२ कोटी ७६ लाख ८० हजार