शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

नवीन प्रादेशिक प्रारूप आराखड्यास उत्तूरकरांचा विरोध

By admin | Updated: January 24, 2017 23:27 IST

हरकती दाखल : जमिनी, घरे होणार जमीनदोस्त; रस्ते रुंदीकरण करू देण्यास विरोध

रवींद्र येसादे -- उत्तूर --नगररचना प्रादेशिक योजनेंतर्गत उत्तूर, (ता. आजरा) येथील गावचा प्रारूप आराखडा नगररचना विभागाने तयार केला आहे. या आराखड्यात ३०, १८ व ४५ मी. असे तीन रस्त्यांचे रुंदीकरण दाखवल्याने उत्तूरकर हवालदिल झाले आहेत. नवीन रस्ते न करता पूर्वीच रस्ते ठेवा, अशी मागणी करत ग्रामस्थांनी हरकती दाखल केल्या आहेत .अधिक माहिती अशी, ग्रामस्थांनी उत्तूरपासून गडहिंग्लज, गारगोटी, आजरा, चव्हाणवाडी, धामणे या जोडणाऱ्या रस्त्यांना पूर्वी जमिनी दिल्या आहेत. पुन्हा त्याच ग्रामस्थांच्या जमिनी रस्ता रुंदीकरणात जाणार आहेत. यामध्ये दुकाने, घरे, शेती, एन. ए. प्लॉट, मंदिरे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारती, जागा यांचा समावेश आहे. प्रारूप आराखडा प्रसिद्ध झाल्याने हरकती दाखल केल्या आहेत.रस्ता रुंदीकरण व नवीन रस्ते यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ येणार आहे. उपजीविकेचे साधन असलेली दुकाने, शेती रस्त्यात जाणार असल्याने ग्रामस्थांची झोप उडाली आहे. नवीन रस्त्यात आंबेओहळ धरणासाठी ज्या धरणग्रस्तांनी व लाभधारकांनी जमिनी दिल्या त्याही नवीन प्रारूप आराखड्यात धरण्यात आल्या आहेत. त्यांनीही हरकती दाखल केल्या आहेत. रस्त्यांच्या शेजारी घरे, एन. ए. प्लॉट कर्ज काढून घेतले आहेत. पूर्वीचे रस्ते असल्याने शासनाचे ना-हरकतीचे दाखले घेऊन खरेदी केले आहेत. रस्ता रुंदीकरणामुळे सारे हवालदिल झाले आहेत. त्यामुळे आराखड्यास विरोध सुरू आहे. जुने रस्ते रुंदीकरण न करता वापरा, नव्याने रस्ता करू नका, अशा हरकती दाखल केल्या आहेत. असा आहे आराखडा ७ ४५ मी. रस्ता - गारगोटी - लक्ष्मी देवालय - गडहिंग्लजकडे (रिंगरोड). ३० मी. रस्ता - गोसावी वसाहत - ते पार्वती शंकर विद्यालय (जुना गारगोटी रस्ता ). १८ मी. रस्ता हुडे माद्याळ -स्वामी समर्थ कॉलनी - स्वस्तिक रोड - तरूक नाला - आजरा रोड रामलिंग पाणंद. (आराखड्यातील नवीन रस्ता) नवीन प्रादेशिक प्रारूप आराखड्यासंदर्भात ग्रामपंचायतीने हरकत दाखल केली आहे. चर्चेतून मार्ग काढूया, असे अधिकाऱ्यांनी सांगितले असले तरी लेखी म्हणणे दिले नाही. ग्रामपंचायत ग्रामस्थांच्या पाठीशी ठाम आहे.