शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

घरकुलांची फक्त पायाभरणीच

By admin | Updated: December 9, 2014 00:26 IST

काम बंदच : इचलकरंजीतील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबीयांची व्यथा; घर मिळण्याची आशा

इचलकरंजी : अनुसूचित जाती-जमाती व नवबौद्धातील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबीयांच्या घरकुलांची पायाभरणी होऊन तीन महिने उलटले तरी संबंधित मक्तेदाराने बांधकामाची कोणतीही प्रगती केली नाही. त्यामुळे ‘त्या’ कुटुंबीयांचे स्वप्न साकारण्याची आशा मावळू लागली आहे.कॉँग्रेसच्या आघाडी सरकारने दारिद्र्यरेषेखालील अनुसूचित जाती-जमाती व नवबौद्ध कुटुंबीयांसाठी प्रत्येकी दीड लाख रुपये किमतीची घरे देण्याची योजना जाहीर केली. या योजनेला रमाई आंबेडकर आवास योजना असे नाव देण्यात आले होते. या कुटुंबांना प्रत्येकी २९५ चौरस फुटाची घरकुले पूर्णपणे शासनाच्या अनुदानाने मिळणार आहेत. शासनाच्या निर्देशाप्रमाणे पहिल्या टप्प्यात १८१ लाभार्थ्यांना घरकुले बांधून देण्याचा निर्णय घेण्यात आला.नगरपालिकेने तयार केलेला हा प्रस्ताव शासनाने स्वीकारला असून, त्याची पहिल्या टप्प्यातील २ कोटी ८८ लाख रुपयांची रक्कम नगरपालिकेकडे वर्ग केली आहे. विधानसभा निवडणुकीची चाहूल लागताच ऐन धामधुमीमध्ये ७ सप्टेंबरला साईट नं. १०२ मध्ये घरकुले बांधण्याचे भूमिपूजन आणि पायाभरणी माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी केले. हा कार्यक्रम माजी खासदार निवेदिता माने यांच्या अध्यक्षतेखाली होणार होता. मात्र, त्यांच्यासह राष्ट्रवादीच्या इतर नगरसेवकांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. त्यामुळे त्यावेळी हा विषय राजकीयदृष्ट्या जोरदार चर्चेचा ठरला होता.घरकुलांच्या पायाभरणीला तीन महिने उलटले तरी संबंधित मक्तेदाराने त्यावेळी पायाभरणीसाठी काढलेले खड्डे या कामाव्यतिरिक्त पुढे कोणतेही काम केलेले नाही. परिणामी, या घरकुलांकडे मात्र लाभार्थी कुटुंबीय अत्यंत आशेने डोळे लावून बसले असून त्यांचे स्वप्न साकार होते की नाही, याची शंका उपस्थित केली जात आहे. (प्रतिनिधी)टक्केवारीची कीडमागासवर्गीयांमधील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबीयांसाठी रमाई आंबेडकर आवास योजनेतून मोफत घरकुले मिळणार असल्याचे महत्त्व ओळखून कॉँग्रेसमधील पक्षश्रेष्ठींनी हा मंजूर करून आणला, पण निविदेसाठी नगरसेवकाची टक्केवारीची कीड लागली असल्याने या घरकुलांच्या बांधकामाला दिरंगाई होत असल्याची नगरपालिका वर्तुळात चर्चा आहे.