जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद सीईओंचे एक पाऊल पुढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:26 IST2021-02-09T04:26:37+5:302021-02-09T04:26:37+5:30

कोल्हापूर : कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेण्याबाबत आरोग्य, महसूल, स्वयंसेवी संस्था, स्वयंसेवक आदींमध्ये संभ्रम व भीतीचे वातावरण होते. ही ...

One step ahead of the Collector, Zilla Parishad CEO | जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद सीईओंचे एक पाऊल पुढे

जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद सीईओंचे एक पाऊल पुढे

कोल्हापूर : कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेण्याबाबत आरोग्य, महसूल, स्वयंसेवी संस्था, स्वयंसेवक आदींमध्ये संभ्रम व भीतीचे वातावरण होते. ही भीती दूर होऊन समाजामध्ये चांगला संदेश जावा, प्रत्येकाने ही लस टोचून घेण्यासाठी पुढे यावे, याकरिता जिल्हाधिकारी दौलत देसाई व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी शिरोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जावून स्वत:ला ही लस टोचून घेतली.

कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेसंदर्भात सोमवारी दुपारी विभागप्रमुखांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. यात जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डाॅ. फारूख देसाई यांनी संगणकीय सादरीकरण केले होते. यात १६ जानेवारी ते ६ फेब्रुवारी दरम्यान ग्रामीण भागात उद्दिष्टांच्या ४० टक्के व शहरी भागात ४९ टक्के लसीकरण झाल्याचे पुढे आले. आतापर्यंत ६९ हजार ८० कोरोना प्रतिबंधक लस आरोग्य विभागाकडे आली आहे. त्यापैकी ३८ हजार ८० लसीचे केंद्रांना वितरण झाले आहे. केंद्रांची संख्याही वाढविण्यात आली आहे. मात्र, लसीकरण मोहिमेला म्हणावा तितका प्रतिसाद अजूनही मिळत नाही, हे जिल्हाधिकारी देसाई व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चव्हाण यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी स्वत:च एक पाऊल पुढे टाकून समाजाच्या मनातील भीती दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या निर्णयाचे कोल्हापूरकरांकडून कौतुक होत आहे. ही लस टोचून घेताना जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डाॅ. फारूख देसाई व शिरोली आरोग्य केंद्रातील डाॅक्टरांसह कर्मचारी उपस्थित होते.

फोटो : ०८०२२०२१-कोल-कलेक्टर व फोटो : ०८०२२०२१-कोल-झेडपी सीईआे

आेळी : कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी साेमवारी दुपारी शिरोली आरोग्य केंद्रात जावून कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेतली.

Web Title: One step ahead of the Collector, Zilla Parishad CEO