मोटारसायकलच्या धडकेत एकजण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:20 IST2021-04-03T04:20:13+5:302021-04-03T04:20:13+5:30

कोल्हापूर : लक्ष्मीपुरीतील आईसाहेब महाराज पुतळा ते फोर्ड काॅर्नर या रस्त्यावरून पायी जात असताना पाठीमागून आलेल्या मोटारसायकलस्वाराने दिलेल्या धडकेत ...

One person was injured in a motorcycle collision | मोटारसायकलच्या धडकेत एकजण जखमी

मोटारसायकलच्या धडकेत एकजण जखमी

कोल्हापूर : लक्ष्मीपुरीतील आईसाहेब महाराज पुतळा ते फोर्ड काॅर्नर या रस्त्यावरून पायी जात असताना पाठीमागून आलेल्या मोटारसायकलस्वाराने दिलेल्या धडकेत एकजण जखमी झाले. याबाबतची फिर्याद स्वत: जखमी संजय तुकाराम शिंगे (वय ५०, रा. शाहूपुरी, सुतारवाडा, शाहू रोड) यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार संशयित विनय शिवाजी पुरेकर (वय २९, रा. जोर्तिंलिंग काॅलनी, रिंग रोड फुलेवाडी) यांच्यावर गुन्हा नोंद झाला.

फिर्यादी शिंगे हे गुरुवारी सकाळी लक्ष्मीपुरीतील फोर्ड काॅर्नर परिसरातून पायी चालत जात होते. या दरम्यान पाठीमागून आलेल्या संशयित मोटारसायकल स्वार पुरेकर याने रस्त्याची परिस्थितीकडे दुर्लक्ष बेदरकारपणे वाहन चालवून फिर्यादी शिंगे यांना जखमी केले. जखमी अवस्थेत शिंगे यांना त्यांच्या पत्नी व मुलाने सीपीआर रुग्णालयात दाखल केले. याबाबत संशयितावर गुन्हा दाखल झाला असून पोलीस नाईक राऊत तपास करीत आहेत.

Web Title: One person was injured in a motorcycle collision