Kolhapur News: मार्निग वॉक बेतले जीवावर, भरधाव कारच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2023 15:49 IST2023-06-01T14:36:02+5:302023-06-01T15:49:14+5:30
दोघांना स्थानिक नागरिकांनी पकडून बेदम मारहाण केली

Kolhapur News: मार्निग वॉक बेतले जीवावर, भरधाव कारच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू
गणपती कोळी
कुरुंदवाड: तेरवाड (ता. शिरोळ) येथे तेरवाड - हेरवाड रस्त्यावर फिरायला गेलेल्या इसमाचा भरधाव कारने दिलेल्या धडकेत जागीच मृत्यू झाला. महादेव चंदर माने (वय ५०,रा. तेरवाड) असे मृताचे नाव आहे. आज, गुरुवारी पहाटे पावणे सहाच्या सुमारास ही घटना घडली.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार मृत माने हे दररोज सकाळी हेरवाड रस्त्यावर पहाटे व्यायामाच्या निमित्ताने फिरण्यासाठी जात असतात. नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी फिरुन परत येत असताना खुरपे मळ्यानजीक येताच गोव्याहून सांगलीकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने माने यांना पाठीमागून जोराची धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. कारमध्ये चौघे होते. मात्र दोघांना स्थानिक नागरिकांनी पकडून त्यांना बेदम मारहाण केले.
घटनास्थळी कुरुंदवाड पोलिस वेळेत दाखल होवून कारचालकाला ताब्यात घेतले. या घटनेची नोंद पोलिसांत झाली असून मृतदेहाचे दत्तवाड ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. अधिक तपास कुरुंदवाड पोलिस करीत आहेत.