शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी जगात भारताची प्रतिष्ठा जपण्याचं काम करताहेत", शरद पवारांकडून पंतप्रधानांच्या कामाचं कौतुक, काय बोलले?
2
राज्यात पेट्रोल-डिझेलचा एक महिन्याचा साठा; इंधन टंचाईवर छगन भुजबळांची टेन्शन वाढवणारी माहिती
3
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
4
Khushboo Patani : Video - "बेटी विदा नहीं, कुर्बान हुई, गप्प बसणारे आई-वडीलही जबाबदार"; खुशबू पाटनीचा संताप
5
होर्मुझ संकटानंतर आता थेट हिंद महासागरात हायव्होल्टेज ड्रामा; इराणचा १० लाख बॅरलचा ऑइल टँकर केला जप्त!
6
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
7
Vastu Tips: नोकरी-व्यवसायात हवीये मोठी झेप? 'या' ५ वास्तू टिप्स नक्की वापरुन पहा
8
मोठा खुलासा! इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिकेची किती विमानं उद्ध्वस्त झाली? थक्क करणारा आहे आकडा; पाहा संपूर्ण यादी
9
Jinping on Iran War: इराण युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, शी जिनपिंग यांनी दिला चार मुद्द्यांचा प्रस्ताव
10
Twisha Sharma : ट्विशा शर्माचा कॉल कट होण्यापूर्वी आईने ऐकलेला आवाज; गच्चीवर तासाभरात नेमकं काय घडलं?
11
"खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, फक्त क्रिकेटवर लक्ष द्या" रियान पराग समालोचकांवर भडकला!
12
अधिक मास २०२६: १ मंत्र ११ वेळा जपा, अशक्यही शक्य होईल; स्वामी सेवा तारेल, अद्भूत अनुभव येईल!
13
दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना
14
Twisha Sharma : "३० लोक बोलावून मारहाण करीन"; आता ट्विशा शर्माच्या वहिनीने उघड केला सासरच्यांचा क्रूर चेहरा
15
नवी मुंबई हादरली! घणसोलीत रिक्षाचालकांच्या हाणामारीत मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची हत्या; दोन आरोपींना अटक
16
सांगा..मुंबई कशी तुंबणार नाही! नालेसफाईवेळी नाल्यात सापडला चक्क रिक्षाचा सांगाडा अन् भलीमोठी लोखंडी कचरापेटी
17
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
18
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
19
हा निव्वळ भास नाही! तुमच्यातल्या 'सिक्स सेन्स'ची जागृती दर्शवणारे 'हे' १० बदल अनुभवलेत का?
20
ऑनलाइन कंपन्यांविरोधात औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप! १५ लाखांहून अधिक मेडिकल दुकाने बंद
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यात एक खासदार, तीन आमदार वाढणार; २०२९ च्या निवडणुकीत पुन्हा मतदारसंघांची फेररचना

By समीर देशपांडे | Updated: March 25, 2026 20:08 IST

मतदारसंघांची रचनाही पुन्हा बदलणार

समीर देशपांडे

कोल्हापूर : केंद्र सरकारने १ मेपासून जनगणनेची घोषणा केली असून, २०२९ ची लोकसभा आणि विधानसभा निवडणूक नव्या लोकसंख्येच्या आधारावर होणार आहे. बदललेल्या लोकसंख्येच्या निकषांच्या आधारे कोल्हापूर जिल्ह्यात लोकसभेची एक आणि विधानसभेच्या किमान तीन जागा वाढणार आहेत. त्यामुळे येणाऱ्या या निवडणुकांमध्ये जिल्ह्यातील मतदारसंघांची रचनाही पुन्हा बदलणार आहे.

याआधी २००९ मध्ये सध्याची मतदारसंघ रचना अस्तित्वात आली होती. २००९ आधी कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभेचे १२ आमदार होते. गडहिंग्लज आणि सांगरूळ हे दोन विधानसभा मतदारसंघ त्यावेळी विसर्जित करण्यात आले. परिणामी जिल्ह्यात विधानसभेच्या दहाच जागा शिल्लक राहिल्या. आता पुन्हा केंद्र सरकारने जनगणनेची घोषणा केली आहे. ती २०२८ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. गेल्या १५ वर्षांत लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून, त्याची दखल घेऊन आता हे मतदारसंघ नव्याने तयार करण्यात येणार आहे.

सध्या असलेल्या दहा मतदारसंघांपैकी कमीत कमी मतदारसंख्या असलेला कोल्हापूर उत्तर हा मतदारसंघ असून, सर्वांत जास्त मतदार हे कोल्हापूर दक्षिण या मतदारसंघात आहेत. सध्याचे विधानसभा मतदारसंघ हे साडेतीन लाख ते चार लाख लोकसंख्येमागे एक असे आहेत, परंतु इतक्या मोठ्या लोकसंख्येला एक आमदार देण्यापेक्षा अडीच लाख लोकसंख्येला एक आमदार असे सूत्र नव्याने ठरत आहे. अडीच लाख लोकसंख्येला एक आमदार हे सूत्र वास्तवात आल्यास जिल्ह्यात १६ आणि तीन लाख लोकसंख्येला एक आमदार, असे सूत्र ठरवल्यास १३ आमदार संख्या होईल.

नेत्यांकडून अंदाज घेणे सुरू

जिल्ह्यातील विद्यमान आमदार, खासदार आणि नेत्यांनी या संभाव्य बदलाचा अंदाज घेण्यास सुरुवात केली असून, काहींनी निवडणूक आयोगातील निवृत्त अधिकाऱ्यांशीही संपर्क साधला आहे. त्यांच्याकडून आपल्या मतदारसंघाचे संभाव्य चित्र काय असू शकते, याचा अंदाज या नेत्यांना आल्याची चर्चा आहे. त्यामुळे काही विभागांकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्याची पद्धत या नेत्यांनी अवलंबली आहे.

१२ लाख लोकसंख्येला एक खासदार

जिल्ह्याची लोकसंख्या ३८ लाखांहून अधिक असून, १२ लाख लोकसंख्येला एक खासदार असे नवे सूत्र असण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याला लोकसभेचा तिसरा खासदार मिळण्याची शक्यता वाढली आहे.

२०११ नुसार जिल्ह्यातील तालुकावार लोकसंख्या

  • हातकणंगले ४,९४,७४७
  • करवीर ४,८८,४७७
  • शिरोळ ३,२०,१३३
  • पन्हाळा २,५६,२९६
  • कागल २,३०,०७२
  • गडहिंग्लज १,९८,५४९
  • राधानगरी १,९९,७१३
  • चंदगड १,८७,२२०
  • शाहूवाडी १,८०३२२
  • भुदरगड १,५०,३६८
  • आजरा १,२०,२६५
  • गगनबावडा ३५,७७२


महाराष्ट्रात वाढणार जागा

लोकसभेच्या जागा ७२ होण्याची शक्यता
विधानसभेच्या ४३२ जागा होण्याची शक्यता

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur to gain MP, MLAs; constituency reshuffle after 2029 elections.

Web Summary : Kolhapur district is likely to gain one parliamentary and three assembly seats after the 2029 elections due to population growth. Constituency restructuring will occur based on the new census. Leaders are assessing potential changes, anticipating significant shifts in electoral boundaries.