Kolhapur: लेझीम खेळताना हदयविकाराच्या झटक्याने एकाचा मृत्यू, मंदिर प्रदक्षिणा सुरु असतानाच घडली दुर्घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2023 06:31 PM2023-10-23T18:31:54+5:302023-10-23T18:32:08+5:30

आंबा: येथील ग्रामदैवताच्या जागराचा सोहळा रंगला असताना तरूणाई लेझीम नृत्यावर मंदिर प्रदक्षिणा घालत होती. दरम्यानच, लेझीम खेळात तल्लीन होऊन ...

One dies of cardiac arrest while playing Lazeem, accident occurs while going around temple | Kolhapur: लेझीम खेळताना हदयविकाराच्या झटक्याने एकाचा मृत्यू, मंदिर प्रदक्षिणा सुरु असतानाच घडली दुर्घटना

Kolhapur: लेझीम खेळताना हदयविकाराच्या झटक्याने एकाचा मृत्यू, मंदिर प्रदक्षिणा सुरु असतानाच घडली दुर्घटना

आंबा: येथील ग्रामदैवताच्या जागराचा सोहळा रंगला असताना तरूणाई लेझीम नृत्यावर मंदिर प्रदक्षिणा घालत होती. दरम्यानच, लेझीम खेळात तल्लीन होऊन नाचणारे राजाराम पांडूरंग पाटील (वय ४८) यांना दरदरून घाम फूटून ते खाली कोसळले. हदयविकाराचा झटका‌ आल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना काल, रविवारी मध्यरात्री घडली. होतकरू राजारामचा मृत्यू सर्वांच्याच मनाला चटका लावून गेला.

राजाराम पाटील हे अंबेश्वर शिक्षण संस्थेचे संचालक होते. आंबा जंगल सफारीचा ते व्यवसाय करीत होते. गावच्या सार्वजनिक कार्यात त्यांचा नेहमीच पुढाकार होता. गेले आठ दिवस नवरात्रोत्सवातील कार्यक्रमात ते राबत होते. जागरण, धावपळ आणि लेझीम खेळताना झालेल्या दमछाकीमुळे राजारामला हृदयविकाराचा झटका आला अन् मृत्यू झाला. आज पंचकृषीतील दैनंदिन व्यवहार बंद ठेवून त्यांना  श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.  

Web Title: One dies of cardiac arrest while playing Lazeem, accident occurs while going around temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.