कार-दुचाकीच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू, कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर झाला अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2023 16:50 IST2023-06-22T16:50:06+5:302023-06-22T16:50:23+5:30
कारमधील जखमींवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू

कार-दुचाकीच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू, कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर झाला अपघात
सरदार चौगुले
पोर्ले तर्फ ठाणे : कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील ग्रीनपार्क हॅाटेल समोर कार आणि दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. प्रशांत संभाजी भोसले (वय ३३, रा.सातवे, ता.पन्हाळा) असे मृताचे नाव आहे. भोसले हे गोकुळ दूध संघात सुपरवायझर होते. हा अपघात आज, गुरूवारी सकाळच्या दरम्यान घडला. कारमधील जखमींवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, प्रशांत भोसले यांना गोकुळ दूध संघात तीन महिन्यापूर्वी सुपरवायझरपदी बढती मिळाली होती. आज, सकाळी आळवे (ता.पन्हाळा) येथील दुध संस्थेतील कामकाज आटपून प्रशांत गावाकडे जात होते. दरम्यान त्याच्या दुचाकीला रत्नागिरीहून कोल्हापूरच्या दिशेने निघालेल्या कारची ओव्हरटेकच्या नादात जोराची धडक झाली.
यात प्रशांत याचा जागीच मृत्यू झाला. तर कारमधील जखमींना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. घटनेची करवीर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.