मोबाईल चोरीप्रकरणी एकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:28 IST2021-09-05T04:28:03+5:302021-09-05T04:28:03+5:30

याबाबत माहिती अशी, बरगे मळा ते अलायन्स हॉस्पिटल या रस्त्यावर ६ जुलै रोजी मेघनाथ जोगिंदर शहा (वय १९) हा ...

One arrested in mobile theft case | मोबाईल चोरीप्रकरणी एकास अटक

मोबाईल चोरीप्रकरणी एकास अटक

याबाबत माहिती अशी, बरगे मळा ते अलायन्स हॉस्पिटल या रस्त्यावर ६ जुलै रोजी मेघनाथ जोगिंदर शहा (वय १९) हा औषधे आणण्यासाठी जात होता. यावेळी पाठीमागून मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी फोन लावण्यासाठी मोबाईलची मागणी केली. परंतु मेघनाथने त्यास नकार दिल्याने दोघांनी त्याच्या हातातील मोबाईल हिसडा मारून घेत पसार झाले. पोलिसांनी भगतसिंग उद्यानाच्या पिछाडीस दोघा जणांना संशयावरून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली, असता दोघांनी मोबाईल चोरल्याची कबुली दिली. यापैकी एक जण अल्पवयीन असून दुसरा आरोपी चेतन पाटील याला अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरलेला १० हजार रुपयांचा मोबाईल व स्प्लेंडर मोटरसायकल (एमएच ०९ डीडी १४३२) असे एकूण ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा नोंद आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि किरण भोसले, पोलीस हेडकॉन्स्टेबल राजीव शिंदे, संभाजी भोसले, शहनाज कनवाडे, संजय इंगवले, रणजित पाटील, बालाजी पाटील, प्रशांत कांबळे, अमर शिरढोणे, महेश खोत, आयुब गडकरी, सूरज चव्हाण, यशवंत कुंभार व सायबर विभागाचे सचिन बेंडखळे यांच्या पथकाने केली.

Web Title: One arrested in mobile theft case