Kolhapur- अंबाबाई किरणोत्सव: पहिल्या दिवशी संगमरवरी पायरीपर्यंत किरणे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 11:51 AM2024-01-30T11:51:58+5:302024-01-30T11:52:22+5:30

कोल्हापूर : सूर्याच्या उत्तरायण कालखंडातील करवीर निवासिनी अंबाबाईच्या किरणोत्सवाला सोमवारी प्रारंभ झाला. मात्र, धूलिकण, ढगाळ वातावरण व हवा प्रदूषणामुळे ...

On the first day of Kirontsava at Ambabai Temple the sun rays reach the marble steps of Garbhkuti | Kolhapur- अंबाबाई किरणोत्सव: पहिल्या दिवशी संगमरवरी पायरीपर्यंत किरणे

छाया-आदित्य वेल्हाळ 

कोल्हापूर : सूर्याच्या उत्तरायण कालखंडातील करवीर निवासिनी अंबाबाईच्या किरणोत्सवाला सोमवारी प्रारंभ झाला. मात्र, धूलिकण, ढगाळ वातावरण व हवा प्रदूषणामुळे आवरण तयार होत सूर्यकिरणे विखुरली गेली. परिणामी, किरणोत्सवाच्या पहिल्या दिवशी मंदिरातील गर्भकुटीच्या संगमरवरी पहिल्या पायरीपर्यंतच सूर्यकिरणे पोहचली.

दरवर्षी २९ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान उत्तरायण कालखंडातील किरणोत्सवाला सुरुवात होते. गतवर्षीही पहिल्या दिवशी किरणोत्सव पूर्ण क्षमतेने झाला नव्हता. महाद्वार रोड कमानीपासून सायंकाळी ५:३० ला या किरणोत्सवाची सुरुवात झाली. ६.१५ ला ती मंदिरातील गर्भकुटीच्या संगमरवरी पहिल्या पायरीपर्यंत येऊन लुप्त झाली.

किरणोत्सवाचा प्रवास

  • महाद्वार रोड कमान : सायंकाळी ५.३०
  • गरुड मंडपच्या पाठीमागे : ५:३४
  • गरुड मंडपच्या मध्यभागी : ५:४०
  • गणपती मंदिराच्या पाठीमागे : ५:५४
  • कासव चौक : ६:०१ वा.
  • चांदीच्या उंबरठ्याच्या आत : ६.१४
  • अंबाबाई मंदिरातील गर्भकुटीच्या
  • संगमरवरी पहिल्या पायरीपर्यंत : ६.१५

Web Title: On the first day of Kirontsava at Ambabai Temple the sun rays reach the marble steps of Garbhkuti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.