जुने पारगावची विठ्ठल बिरदेव बगाड यात्रा रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:24 IST2021-04-10T04:24:25+5:302021-04-10T04:24:25+5:30

नवे पारगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जुने पारगाव (ता. हातकणंगले) येथील ग्रामदैवत विठ्ठल बिरदेव बगाड यात्रा रद्द झाली असल्याची माहिती ...

Old Pargaon's Vitthal Birdev Bagad Yatra canceled | जुने पारगावची विठ्ठल बिरदेव बगाड यात्रा रद्द

जुने पारगावची विठ्ठल बिरदेव बगाड यात्रा रद्द

नवे पारगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जुने पारगाव (ता. हातकणंगले) येथील ग्रामदैवत विठ्ठल बिरदेव बगाड यात्रा रद्द झाली असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शहाजीराव पाटील यांनी दिली.

जुने पारगाव गाव चावडीत यात्रेसंदर्भात शहाजीराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. कोरोना संकटामुळे गावच्या यात्रा बंद करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी आदेश दिले आहेत. त्याला प्रतिसाद देत सलग दुसऱ्या वर्षी जुने पारगावची यात्रा रद्द करण्याचा बैठकीत निर्णय घेण्यात आला.

यावेळी जुने पारगावचे सरपंच अरविंद पाटील, पोलीस पाटील इंद्रजीत पाटील, पाराशर विकास संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब मोरे, पंचायत समितीचे माजी सदस्य शिवाजी सिद, रामबापू पाटील, रामचंद्र सिद, राजेंद्र धुमाळ, बाळकृष्‍ण पाटील, कृष्णात सिद, संजय कुलकर्णी, सुहास कारंडे, संपत पोवार, ग्रामविकास अधिकारी एम.आर. पाटील, तलाठी प्रधान भानसे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Old Pargaon's Vitthal Birdev Bagad Yatra canceled