शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

‘प्रदूषण नियंत्रण’चे अधिकारी पळाले

By admin | Updated: February 24, 2015 00:56 IST

‘एव्हीएच’विरोधी आंदोलन : आदेशाविना परत, आक्रमक आंदोलन; निषेध, अधिकारी, कर्मचाऱ्यांना काढले बाहेर

कोल्हापूर : चंदगड तालुक्यातील एव्हीएच विरोधी सोमवारी काढण्यात आलेल्या मोर्चाला सामोरे जाण्यासाठी पोलीस बंदोबस्तात आलेले ‘प्रदूषण’चे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आंदोलकांचा आक्रमक पवित्रा पाहून पळ काढला. गेट ढकलून आत येण्याचा प्रयत्न करीत असलेल्या आंदोलकांना पाहून प्रादेशिक प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी एस. एस. डोकेंसह कर्मचाऱ्यांनी कार्यालयापर्यंत पळत आसरा घेतला.उत्पादन बंद करण्याचा आदेश मिळाल्याशिवाय येथून जाणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली, पण शेवटी आदेशाविनाच आंदोलन थांबविण्यात आले. कृती समितीच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चाच्यावेळी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सकाळी ११ वाजताच उद्योग भवन समोरील रस्ता दोन्हींकडे बॅरेकटस लावून पोलिसांनी बंद केला होता. परिणामी उद्योग भवनातील विविध कार्यालयांत जाणाऱ्यांची गैरसोय झाली. आमदार संध्यादेवी कुपेकर, आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली डोके यांची भेट घेतली. चर्चेत डोके यांच्याकडून ठोस काही हाती लागले नाही. नकारात्मकतेमुळे शिष्टमंडळाने डोके यांना तुम्हीच आंदोलकांना उत्पादन बंद करण्याचा अधिकार मला नाही असे सांगा, असे आग्रह करू लागले. सुरुवातीला डोके यांनी आढेवेढे घेतले. शिष्टमंडळातील अ‍ॅड. संतोष मळवीकर डोके यांना खुर्चीवरून उचलून नेण्यासाठी जवळ गेले असता पोलिसांनी त्यांना त्वरित रोखले. आता आपली काही सुटका नाही, असे लक्षात येताच डोके यांनी आंदोलकांसमोर येण्याची कबुली दिली. शिष्टमंडळाने डोके यांच्यासोबत सर्वच कर्मचाऱ्यांना बाहेर काढून कार्यालयास कुलूप लावले.डोके पोलिसांच्या बंदोबस्तात आले. ते हातात माईक घेऊन एव्हीएच प्रकल्पाचे उत्पादन बंद करणे माझ्या हातात नाही, वरिष्ठांना माहिती देतो, असे सांगताच आंदोलक अतिशय आक्रमक झाले. गेट ढकलून ते डोकेंच्या दिशेने येऊ लागले. हे लक्षात येताच डोकेंसह सोबत आलेले अधिकारी, कर्मचारी पळून कार्यालयात घुसले. (प्रतिनिधी)पोलीस वाहन अडविले..आंदोलकांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी वाहन आणले. आंदोलकांना पोलिसांनी वाहनात घातले. दरम्यान, ताब्यात घेतला की सोडायचे नाही, असे म्हणत काही आंदोलकांनी पोलिसांचे वाहन रोखून धरले. पोलीस निरीक्षकांच्या वाहनाच्या समोर एक तरुण चक्क झोपला. यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला. अर्धा तासानंतर पोलीस वाहन मार्गस्थ झाले. डोके यांना झापले..डोके यांनी मग्रुरीने पाच जिल्'ांचा अधिकारी असल्याचे आमदार क्षीरसागर यांना सांगितले. यावर क्षीरसागर प्रचंड संतापले. त्यांनी चढ्या आवाजात कोणाशी तुम्ही बोलताय, एका जिल्'ाचा कारभार सांभाळता येतोय का, तुम्ही काय करता, ते आता बाहेर काढतो, असे सुनावले.