पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट, एकजण ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2024 11:36 IST2024-02-01T11:36:19+5:302024-02-01T11:36:44+5:30
मुरगूड : कोल्हापूरचे पालकमंत्री व राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात सोशल मीडियावरून आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी ...

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट, एकजण ताब्यात
मुरगूड : कोल्हापूरचे पालकमंत्री व राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात सोशल मीडियावरून आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी मुरगूड पोलिसांनी एकावर गुन्हा नोंद करून त्याला ताब्यात घेतले आहे. तमनाकवाडा, ता. कागल येथील अनिल रामचंद्र काळगे असे त्याचे नाव आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर मुरगूडला आणण्यात येणार आहे, असे समजताच नागरिक संतप्त झाले होते.
अधिक माहिती अशी, अनिल काळगे यांनी बुधवारी दुपारी मंत्री मुश्रीफ यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केली. सदर इसम वारंवार अशा पोस्ट करतो, त्यामुळे त्याच्यावर पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. आज कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विकास पाटील कुरुकलीकर यांनी याबाबत मुरगूड पोलिसांत तक्रार दिली.
त्यानुसार मुरगूड पोलिसांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. वारंवार अशा प्रकारे पोस्ट व्हायरल करून वातावरण विनाकारण बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या या तरुणावर पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशी मागणी विकास पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी केली आहे.