शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
2
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
3
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
4
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
5
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
6
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
7
उन्हाळ्यात कलिंगड खाणं पडलं महागात! बक्सरमध्ये एकाच कुटुंबातील ८ जणांना विषबाधा; आरोग्य विभाग अलर्टव
8
मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?
9
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
10
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
11
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
12
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
13
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
14
अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास
15
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
16
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
17
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
18
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
19
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
20
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
Daily Top 2Weekly Top 5

‘नाईट लँडिंग’मधील अडथळे दूर करणे शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:26 IST

कोल्हापूर : नियोजनबध्द आणि अधिकारी, लोकप्रतिनिधींनी सामूहिकपणे प्रयत्न केल्यास कोल्हापूरच्या विमान सेवेला गती देण्यासाठी आवश्यक असलेल्या नाईट लँडिंगमधील अडथळे ...

कोल्हापूर : नियोजनबध्द आणि अधिकारी, लोकप्रतिनिधींनी सामूहिकपणे प्रयत्न केल्यास कोल्हापूरच्या विमान सेवेला गती देण्यासाठी आवश्यक असलेल्या नाईट लँडिंगमधील अडथळे दूर करणे शक्य आहे. सध्या असलेली १३७० मीटरची धावपट्टी पहिल्या टप्प्यात १९०० मीटर झाल्यास केंद्र सरकारच्या उडान योजनेतील चौथ्या टप्प्यातून काही नवीन मार्गावरील सेवा कोल्हापूरमधून सुरू होऊ शकतात. गेल्या दोन आठवड्यापूर्वी विमानतळ आणि तेथील सेवेच्या विस्तारीकरणाबाबत लोकप्रतिनिधी आणि विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यावेळी काही अडथळ्यांबाबत चर्चा झाली. हे अडथळे आणि ते दूर करण्याबाबतच्या काही उपायांचा ‘लोकमत’ने आढावा घेतला.

या अडथळ्यांवर काय करता येईल?

१) फनेल एरियातील अडथळे : स्पष्टपणे दृश्यता (व्हिजीबिलिटी) येण्यासाठी विमानतळाच्या फनेल एरियामध्ये काही अडथळे आहेत. त्यात केआयटी कॉलेज, वैभव हौसिंग सोसायटी परिसरातील काही इमारतींचा भाग, पाण्याची टाकी यांचा समावेश आहे. नाईट लँडिंग सुविधेसाठी देखील हे अडथळे दूर करणे आवश्यक आहे. संबंधीत परिसरातील नागरिकांशी चर्चा करून सामंजस्याने हे अडथळे दूर करता येतील.

२) हाय टेन्शन पॉवर लाईन : ही उच्च दाबाची विद्युतवाहिनी स्थलांतरित करण्याचा मुद्दा पुढे आला आहे. हे काम करण्यासाठी निधी उपलब्ध होण्यात अडचण असल्याचे दिसते. त्यावर या विद्युत वाहिनीच्या दुसऱ्या बाजूने विमानाचे टेकऑफ, लँडिंग करण्याचा पर्याय आहे.

३) ऑल वेदर लाईट : नाईट लँडिंगसह सर्व ऋतूमध्ये विमानसेवा सुरू करण्यासाठी ऑल वेदर लाईट, अप्रोच लायटिंग आवश्यक आहे. या सुविधेसाठी धावपट्टी विस्तारीकरणाचे काम लवकर पूर्ण करणे आवश्यक आहे.

४) अतिरिक्त भूसंपादन : धावपट्टीच्या विस्तारीकरणासाठी गडमुडशिंगीच्या बाजूकडील ३२ एकर अतिरिक्त भूसंपादन होणे गरजेचे आहे. ही भूसंपादनाची प्रक्रिया महसूल विभागाकडून गतीने व्हावी.

५) मोठी विमाने उतरण्यातील अडचण : एटीआर ७२, एम्ब्रररसारखी विमाने कोल्हापूर विमानतळावर उतरण्यासाठी किमान १९०० मीटरची धावपट्टी असणे आवश्यक आहे. सध्या असलेली १३७० मीटरची धावपट्टी १९०० मीटरपर्यंत वाढविल्यास मोठी विमाने याठिकाणी उतरविता येतील. त्यामुळे उडान योजनेच्या चौथ्या टप्प्यात नव्या मार्गावरील सेवा कोल्हापूरमधून सुरू करता येईल.

अन्य सुविधा...

जिल्ह्यात तीन मोठ्या औद्योगिक वसाहती असल्याने कार्गो सेवा भविष्यात वाढणार आहे. ते लक्षात घेऊन त्यादृष्टीने सध्या विमानतळाच्या कार्यालयाची इमारत कार्गो सेवेच्या कार्यालयासाठी वापरण्यात यावी. विमानतळाकडे जाणारे अप्रोच रोडच्या चौपदरीकरणाबाबत प्राधिकरणाकडून, तर विमानतळ ते कोल्हापूर शहर अशी मिनी बस सेवा (एसी सुविधेसह) पुरविण्याबाबत केएमटीकडून विचार व्हावा.

प्रतिक्रिया...

विमानतळ विस्तारीकरणातील अडथळे पाहता, ते दूर करणे शक्य आहे. त्याबाबत या विस्तारीकरणाचे काम पाहणाऱ्या अधिकाऱ्यांनी केवळ कागदोपत्री प्रयत्न करण्याऐवजी नियोजनबध्द कामाला प्राधान्य द्यावे. प्रत्येक काम पूर्णत्वाची मुदत निश्चित करावी. त्यादृष्टीने नियोजन करावे.

- विज्ञानंद मुंढे, सदस्य, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स