शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

वर्षात २८ हजार मतदार वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या सव्वा वर्षात २८ हजार ८६३ इतके मतदार वाढले आहेत. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या सव्वा वर्षात २८ हजार ८६३ इतके मतदार वाढले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या वेळी कोल्हापूर जिल्ह्यातील मतदारांची आकडेवारी ३० लाख ९३ हजार ४३ इतकी होती. वर्षभरात ही संख्या ३१ लाख २१ हजार ९०६ इतकी झाली आहे. यात १६ लाख ५३८ पुरुष तर १५ लाख २१ हजार २९० महिला आहेत. निवडणूक आयोगाने राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून ई ईपीक प्रणाली कार्यान्वित केली आहे. याअंतर्गत मतदार यादीत मतदारांच्या नावापुढे त्यांचा मोबाइल नंबर असल्यास त्यांना ई-मतदार ओळखपत्र मोबाइलवर डाऊनलोड करता येईल व ते मतदानासाठी ग्राह्य धरले जाईल.

दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी लोकशाहीने दिलेला मतदानाचा हक्क बजावून नवभारत घडविण्यासाठी मतदारांनी मतदानास पुढे यावे, असे आवाहन केले. यावेळी त्यांनी लोकसभा, विधानसभा, पदवीधरच्या निवडणुका असोत किंवा ग्रामपंचायत सर्वच निवडणुकांमध्ये मतदानात कोल्हापूर अग्रेसर असल्याचे गौरवोद्‌गार काढले.

यावेळी आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, तहसीलदार शीतल मुळे-भांबरे, शाहीर आझाद नायकवडी यांच्यासह अधिकारी-कर्मचारी व नवमतदार उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थितांना शपथ दिली.

डॉ. बलकवडे यांनी लोकशाहीने दिलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी प्रत्येकाने मतदान करणे आवश्यक आहे, असे आवाहन केले. उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे यांनी प्रास्ताविक केले. दिव्यांग मतदार, नवमतदारांना मतदान ओळखपत्र मतदार दिनानिमित्त घेण्यात आलेल्या ब्रेल लिपी, निबंध व वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले. निवडणूक साक्षरतेमध्ये उल्‍लेखनीय काम केलेल्या कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

--