शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याला जाण्यासाठी दिवसातून सहा ‘शिवाई’ बसेस, दोन महिन्यात किती मिळाले उत्पन्न.. वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 15:38 IST

दिवसेंदिवस शिवाईचा प्रतिसाद वाढत आहे

कोल्हापूर : कोल्हापूर ते पुणे मार्गावर धावणाऱ्या ई-शिवाईला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. कोल्हापुरातून दिवसभरात १२ फेऱ्या होतात. दोन महिन्यातच शिवाईतून एसटीला १ कोटी ८२ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. दिवसेंदिवस शिवाईचा प्रतिसाद वाढत आहे. कोल्हापूर विभागाच्या ६ आणि स्वारगेटच्या ६ अशा बारा फेऱ्या कोल्हापूर ते स्वारगेट मार्गावर होतात.राज्य सरकारने ‘ई-शिवाई’ ही बससेवा सुरू केली. पुणे विभागाकडे सध्या ६६ ई-शिवाई बस आहेत. पुणे ते छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, नाशिक, कोल्हापूर आणि सोलापूर या मार्गावर ई-शिवाई बससेवा देण्यात येत आहे. यापैकी कोल्हापूर विभागातून पुणेकडे सहा शिवाई धावत आहेत.

जिल्ह्यात सहा शिवाई बसेसकोल्हापूर विभागाने पुणे प्रादेशिक विभागाकडे प्रवाशांच्या केलेल्या मागणीनुसार जादा ई-शिवाईची मागणी केली होती. मात्र विभागाने तूर्त तरी सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या कोल्हापूर-स्वारगेट मार्गावर सहा शिवाई बसेस धावत आहेत.

कोल्हापूर ते स्वारगेट मार्गावर शिवाईच्या वेळासकाळी ५ वा, सकाळी ६ वा, सकाळी ७ वा, सकाळी ८ वा, सकाळी ९ वा, सकाळी १० वा,  दुपारी २ : ३०, दुपारी ३ : ३०, सायंकाळी ४: ३०, सायंकाळी ५ : ३०, सायंकाळी ६ : ३०, रात्री ७ : ३०

दोन महिन्यांत १ कोटी ८२ लाखांचे उत्पन्नगेल्या दोन महिन्यांत ई-शिवाईने एसटीच्या महसूलात वाढ झाली. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्यात एकूण १ कोटी ८२ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले.

चार्जिंग सेंटरसध्या चार्जिंग सेंटरची संख्या कमी आहे. त्यामुळे ई-शिवाईची संख्याही कमी असल्याचे चित्र आहे. चार्जिंग स्थानकांंत अतिउच्च दाबाचा विद्युतपुरवठा आवश्यक आहे. त्यासाठी महावितरणबरोबर करार झाला आहे. एक बस चार्ज होण्यासाठी किमान एक ते दीड तासाचा कालावधी लागतो. मात्र, अचानक विद्युतपुरवठा खंडित झाल्यास किंवा तांत्रिक बिघाड झाल्यास चार्जिंग स्थानक बंद पडते. चार्जिंग स्थानकांंची संख्येत वाढ होण्याची गरज आहे.

ई-शिवाईला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. कोल्हापूर ते पुणे मार्गावर बसेस धावत आहेत. प्रवाशांचा वाढता प्रतिसाद पाहून महामंडळाच्या ताफ्यात आणखी ई-शिवाई दाखल होण्यासाठी वरिष्ठांचे प्रयत्न सुरू आहेत. - मल्लेश विभुते, स्थानकप्रमुख, मध्यवर्ती बसस्थानक

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPuneपुणे