शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

आता एकाच अर्जात निवृत्तिवेतन

By admin | Updated: August 27, 2015 00:22 IST

‘निवृत्तिवेतन वाहिनी’ : १ सप्टेंबरपासून लागू होणार आॅनलाईन पद्धत

कोल्हापूर : शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होताना कार्यालय प्रमुखांकडून विविध प्रपत्रे भरून घेतली जात होती. यात निवृत्तिवेतन मिळण्यास बराच काळ लागत होता. मात्र, १ सप्टेंबरपासून लागू होणाऱ्या ‘निवृत्तिवेतन वाहिनी’मुळे ही किचकट प्रक्रिया आता सुलभ होणार असून, जिल्हा परिषदेतून येत्या सहा महिन्यांत निवृत्त होणाऱ्या ४२ जणांना एकच अर्ज भरून या प्रक्रियेचा लाभ घेता येणार आहे. याशिवाय ही प्रक्रिया सर्वच शासकीय कार्यालयांना लागू करण्यात आली आहे. शासकीय सेवेतून अथवा स्वेच्छानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून, तसेच सेवेत असताना मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्याची विहित नमुन्यातील अनेक प्रकारची कागदपत्रे कार्यालय प्रमुखांकडून व कर्मचाऱ्यांच्या नातेवाइकांकडून घेतले जात होते. त्यामुळे कर्मचारी निवृत्त होऊन वर्ष झाले तरी त्याला निवृत्तिवेतन लागू होत नव्हते. मात्र, राज्य शासनाने यात सुधारणा करीत एकाच प्रकारचा अर्ज, तोही आॅनलाईन पद्धतीने भरून दिल्यानंतर, ज्या दिवसापासून कर्मचारी निवृत्त होणार, त्या दिवसापासून त्याला निवृत्तिवेतन लागू होणार आहे. याचा लाभ जिल्हा परिषदेतील ४२ कर्मचाऱ्यांना होणार आहे, हे सर्व कर्मचारी येत्या सहा महिन्यांत टप्प्याटप्प्याने निवृत्त होणार आहेत. जिल्हा परिषदेचा विचार करता, यापूर्वीच्या ‘परिभाषित निवृत्तिवेतन’मध्ये त्रुटी असल्याने अनेकांना निवृत्तिवेतन मिळताना अडचणी येत होत्या. १ सप्टेंबरनंतर निवृृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर तत्काळ निवृत्तिवेतन मिळणार आहे. सध्या जिल्हा परिषदेकडे १० हजार ४०५ निवृत्तिवेतनधारक आहेत. त्यांच्यावर २०१४-१५ या सालापर्यंत १६० कोटी ५९ लाख ५३ हजार ३२१ रुपये इतका पेन्शनपोटी खर्च केला आहे; तर २०१५-१६ या चालू काळात ७३ लाख रुपये खर्च केले आहेत. १ सप्टेंबर २०१५ नंतर ४२ कर्मचारी निवृत्त होणार आहेत. मागील प्रणालीमधील दोन प्रकरणे कागदपत्रांच्या त्रुटीमुळे प्रलंबित आहेत. ( प्रतिनिधी )येत्या आठ दिवसांत प्रलंबित दोन प्रकरणांची निर्गत करू. याशिवाय १ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या ‘निवृत्तिवेतन वाहिनी’मुळे येथून पुढे होणाऱ्या निवृत्तिवेतनधारकांना एकच अर्ज, तोही आॅनलाईन भरल्यानंतर त्या कर्मचाऱ्याच्या निवृत्तीच्या दिवसापासून त्याला निवृत्तिवेतनाचा लाभ मिळणार आहे. - गणेश देशपांडे, मुख्य वित्त, लेखाधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूरनिवृत्त होणारे ४२ जण शिक्षकच१ सप्टेंबर २०१५ ते फेबु्रवारी २०१६ अखेर जिल्हा परिषदेकडील ४२ शिक्षक टप्प्याटप्याने निवृत्त होणार आहेत. निवृत्त होणाऱ्यांमध्ये २१ मुख्याध्यापक, १५ अध्यापक, ४ केंद्रप्रमुख आणि २ पदवीधर अध्यापकांचा समावेश आहे.