राज्यात अंगणवाडी सेविकांचे नोव्हेंबरचे मानधन अडकले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2019 03:12 AM2019-12-25T03:12:48+5:302019-12-25T03:13:35+5:30

राज्यातील दोन लाख सात हजार ९६१ कर्मचाऱ्यांना प्रतीक्षा

November honors of Anganwadi servicemen in the state got stuck | राज्यात अंगणवाडी सेविकांचे नोव्हेंबरचे मानधन अडकले

राज्यात अंगणवाडी सेविकांचे नोव्हेंबरचे मानधन अडकले

Next

नसिम सनदी 

कोल्हापूर : डिसेंबर संपत आला तरी अजून नोव्हेंबरचे मानधन हातात पडलेले नसल्यामुळे राज्यभरातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. मंत्रिपदाच्या घोळामुळे मानधनाबद्दल दाद तरी कुणाकडे मागायची, असा प्रश्न कर्मचाºयांना पडला आहे. राज्यातील दोन लाख सात हजार ९६१ अंगणवाडी कर्मचाºयांचे १२६ कोटी ८८ लाख ८२ हजारांचे मानधन थकले आहे.

आक्रमक आंदोलनामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच तत्कालीन महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी आॅगस्टमध्ये मानधन वाढ लागू करण्याचा निर्णय घेतला. वाढीव मानधन फरकासह देण्याचाही निर्णय झाला; पण आचारसंहिता सुरू झाल्याने मानधनवाढ लागू झाली; पण फरकाचा मुद्दा तसाच मागे राहिला आहे. वाढीव दराने दोनच महिने मानधन मिळाले आहे. मोबाईल कार्ड रिचार्जचे तीन महिन्यांसाठी ४०० रुपये देण्यात आले. ही रक्कमही दोन महिन्यांपासून मिळालेली नाही. ११ महिन्यांचा फरक मिळेना
आॅक्टोबर २०१८ ते सप्टेंबर २०१९ असा ११ महिन्यांचा फरक अद्याप कर्मचाºयांना मिळालेला नाही. भाऊबीजेची रक्कम एक हजारावरून दोन हजार रुपये करण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार ३९ कोटी ९३ लाख रुपये देण्यात येत होते; पण त्यांतील एक रुपयाही अद्याप मिळालेला नाही.
 

Web Title: November honors of Anganwadi servicemen in the state got stuck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई