शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीत 'गँगवार'चा भडका! पोलिसांच्या डोळ्यांदेखतच गुन्हेगारावर गोळीबार; हल्लेखोर फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 23:51 IST

जुन्या वैमनस्यातून घडली गोळीबाराची घटना

Kolhapur Crime: कोल्हापूर जिल्ह्यातील वस्त्रनगरी म्हणून ओळखले जाणारे इचलकरंजी शहर बुधवारी गोळीबाराने हादरून गेले. सांगली रोडवर पूर्ववैमनस्यातून एका रेकॉर्डवरील गुन्हेगारावर भररस्त्यात गोळ्या झाडण्यात आल्या. धक्कादायक बाब म्हणजे, हा थरार उपस्थित असलेल्या पोलिसांसमोरच घडला, ज्यामुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

सांगलीवाडी येथील गुन्हेगार ओंकार कांबळे आणि इचलकरंजीतील एका स्थानिक टोळीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वाद धुमसत होता. बुधवारी या दोन्ही गटांचा आमना-सामना झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी ओंकार कांबळेवर बंदुकीतून गोळ्या झाडल्या. गोळ्या झाडल्यानंतर हल्लेखोर वेगाने घटनास्थळावरून पसार झाले.

रक्ताच्या थारोळ्यात अन् प्रकृती चिंताजनक

गोळीबाराच्या या हल्ल्यात ओंकार गंभीर जखमी झाला असून तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याला तातडीने सीपीआर रुग्णालयात नेण्यात आले, मात्र प्रकृती अधिक बिघडल्याने त्याला कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सध्या त्याची मृत्यूशी झुंज सुरू असून प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

पोलिसांसमोरच धाडस

ज्यावेळी हा गोळीबार झाला, तेव्हा तिथे पोलीस कर्मचारी उपस्थित होते. पोलिसांच्या उपस्थितीतच गुन्हेगाराने शस्त्र काढून गोळ्या झाडल्याने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे इचलकरंजीतील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

तपासाची चक्रे फिरली

घटनेची भीषणता पाहून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली आहे. प्राथमिक अंदाजानुसार, हा हल्ला गँगवार किंवा जुन्या वैमनस्यातून झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. हल्लेखोरांच्या शोधासाठी पोलिसांची विविध पथके रवाना करण्यात आली असून सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमांवर कडक नाकाबंदी करण्यात आली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Gang war erupts in Ichalkaranji; Criminal shot before police, flees.

Web Summary : Ichalkaranji rocked by a gang war as a criminal was shot in broad daylight in front of police. The victim is critically injured and hospitalized. Police are investigating and searching for the assailants.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस