शहरं
Join us  
Trending Stories
1
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
2
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
3
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
4
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
5
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
6
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
7
काय सांगता... सर्व विषयांत ३५ गुण! सोलापूरची निकिता कुसेकर दहावी पास
8
झाडावर कसा चढतो साप? व्हिडिओ पाहून नेटकरीही थक्क, तुम्ही कधी बघितलं का?
9
Latest Marathi News LIVE: दाऊदचा 'खास' सलीम डोला याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
10
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
11
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
12
धक्कादायक वास्तव! रुग्णवाहिका आहे पण रस्ता नाही, वेदनांनी व्याकुळ झाली ‘ती’; गुडघाभर चिखलातून....
13
राज्यपालांनी ११८ मागितले, विजयने जमविले...! गाठला बहुमताचा आकडा, त्रिशंकू विधानसभेचा पेच सुटला
14
ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी मुख्यमंत्री होणार; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला दुसरे उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता
15
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
16
साध्या गणवेशात २० पोलीस, चार दिवस ठेवली नजर; निदा खानला कसे पकडले?
17
विजयला मदत करू शकत होता ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी...
18
काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन
19
नवी ७-सीटर इलेक्ट्रिक SUV Lexus 'TZ' लाँच; ५३० किमी रेंज, अवघ्या ३५ मिनिटांत होणार चार्ज! बघा फीचर्स
20
"आम्हाला काँग्रेसपासून वेगळं बसवा"; कनिमोझींचं थेट लोकसभा अध्यक्षांना पत्र; तामिळनाडूच्या राजकारणात मोठा भूकंप
Daily Top 2Weekly Top 5

नव्या आयुक्तांकडून सोमवारी बैठकीच्या सूचना

By admin | Updated: January 17, 2015 00:08 IST

आज स्वीकारणार सूत्रे : अधिकाऱ्यांत खळबळ

कोल्हापूर : महापालिकेचे नूतन आयुक्त पी. शिवशंकर उद्या, शनिवारी आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांच्याकडून पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. मात्र, नवीन आयुक्त प्रत्यक्ष कामास सोमवार (दि. १९)पासून सुरुवात करणार आहेत. तत्पूर्वी सोमवारी महापालिकेच्या सर्व विभागप्रमुखांच्या आढावा बैठकीचे नियोजन करण्याच्या सूचना आज, शुक्रवारी नूतन आयुक्तांनी संबंधितांना मेलद्वारे दिल्या आहेत. आयुक्तांनी कोल्हापुरात दाखल होण्यापूर्वीच प्रत्यक्ष कामास सुरुवात केल्याने अधिकाऱ्यांत खळबळ उडाली आहे.आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी २१ जानेवारीला कर्नाटक स्टाफ सिलेक्शन कमिटीच्या विभागीय संचालकपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. त्यांच्या जागी गडचिरोली येथील सहायक जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांची नियुक्ती झाली. उद्या, शनिवारी होणाऱ्या महासभेत तसेच सभेनंतर कर्मचारी व पदाधिकाऱ्यांतर्फे आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांच्या निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. यानंतर नूतन आयुक्त पदभार स्वीकारणार आहेत. प्रत्यक्ष कामास ते सोमवारपासून सुरुवात करणार आहेत. प्रत्यक्ष कामाच्या पहिल्या दिवशीच नूतन आयुक्तांनी खातेप्रमुखांची आढावा बैठक बोलावली आहे. प्रत्येक खात्याचा आढावा व वस्तुस्थितीची माहिती ते घेणार आहेत. खातेप्रमुखांनी सर्व इत्थंभूत माहितीसह बैठकीला हजर राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आज दिवसभर सर्वच विभागांत नूतन आयुक्तांना द्यावयाच्या माहितीचे संकलन करण्याचे काम सुरू होते. कार्यालयात रात्री उशिरापर्यंत धांदल सुरू होती. (प्रतिनिधी)

उद्या सायंकाळपर्यंत कोल्हापुरात येत आहे. सोमवारपासून प्रत्यक्ष कामास सुरुवात करू. कोल्हापूर शहर व परिसराबाबत अधिक माहिती नाही. यासाठीच ‘पॉवर प्रझेंटेशन’साठी खातेप्रमुखांनी सर्व माहितीसह बैठकीला येण्याबाबत निरोप दिला आहे. खातेप्रमुखांच्या सोमवारी होणाऱ्या बैठकीतून महापालिका व शहराच्या सद्य:स्थितीबाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष लाईन आॅफ अ‍ॅक्शन ठरविता येईल.
- पी. शिवशंकर
(नूतन महापालिका आयुक्त)