Kolhapur: गोल्डलाईफ फसवणुकीतील नववा आरोपी अटकेत, शेअर मार्केटच्या आमिषाने घातला पाच कोटींचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 12:21 IST2026-02-17T12:19:21+5:302026-02-17T12:21:40+5:30

गुन्हा दाखल होताच डिसेंबर २०२३ पासून तो पसार होता.

Ninth accused in Goldlife fraud case of Rs 5 crores with the lure of stock market arrested | Kolhapur: गोल्डलाईफ फसवणुकीतील नववा आरोपी अटकेत, शेअर मार्केटच्या आमिषाने घातला पाच कोटींचा गंडा

Kolhapur: गोल्डलाईफ फसवणुकीतील नववा आरोपी अटकेत, शेअर मार्केटच्या आमिषाने घातला पाच कोटींचा गंडा

कोल्हापूर : गोल्डलाईफ डिस्ट्रिब्युटर्स कंपनीकडून शेअर मार्केटच्या माध्यमातून गुंतवणुकीवर दरमहा साडेचार टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून पाच कोटी ६२ लाखांची फसवणूक केलेल्या टोळीतील नवव्या आरोपीला आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सोमवारी (दि. १६) अटक केली. अतुल बळवंत वाघ (रा. कदमवाडी, कोल्हापूर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. गुन्हा दाखल होताच डिसेंबर २०२३ पासून तो पसार होता.

अटकेतील आरोपी इंद्रजित सुभाष कदम (वय ४६, रा. प्रतिभानगर, कोल्हापूर) याने गोल्डलाईफ डिस्ट्रिब्युटर्स कंपनीच्या माध्यमातून गुंतवणूक गोळा केली. शेअर मार्केटमधून गुंतवणुकीवर दरमहा साडेचार टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून त्याने ऑगस्ट २०२२ ते डिसेंबर २०२३ या कालावधीत कोट्यवधी रुपये जमवले. प्रत्यक्षात परतावा आणि मुद्दल न मिळाल्याने गुंतवणूकदार विजया दीपक कांबळे (४६, रा. प्रतिभानगर) यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक महेश इंगळे करीत आहेत.

एकूण नऊपैकी आठ आरोपींना अटक झाली होती. गुन्हा दाखल झाल्यापासून पसार असलेला एजंट अतुल वाघ याला पोलिस अंमलदार बाबूमिया काझी यांनी सोमवारी पाचगाव येथून अटक केली. न्यायालयात हजर केले असता त्याला शुक्रवारपर्यंत (दि. २०) पोलिस कोठडी मिळाली.

नऊ जणांवर गुन्हा

कंपनीचा प्रमुख इंद्रजित कदम याच्यासह राहुल शशिकांत गाडवे (५२, रा. राजारामपुरी, सातवी गल्ली), कुमार जोतिराम उबाळे (५२, रा. राजेंद्रनगर, कोल्हापूर), अमरदीप बाबूराव कुंडले (४९, रा. राजगड कॉलनी, कोल्हापूर), अतुल बळवंत वाघ (का. कदमवाडी), शैलेश नामदेव वाघ (रा. फुलेवाडी, कोल्हापूर), शैलेश अर्जुन मरगज (४२, रा. शिवाजी पेठ, कोल्हापूर), आबासो बाळू वाडकर (४७) आणि सुनीता आबासो वाडकर (३८, दोघे रा. मणेर मळा, उचगाव) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

अडीच कोटींची मालमत्ता जप्त

पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करून कंपनीचा प्रमुख कदम याच्यासह इतर संचालक आणि एजंट यांची अडीच कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. संबंधित मालमत्तेचा लिलाव करण्याच्या प्रक्रियेसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पत्रव्यवहार सुरू आहे. लवकरच याला मंजुरी मिळेल, अशी माहिती आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या उपअधीक्षक सुवर्णा पत्की यांनी दिली.

Web Title : कोल्हापुर गोल्डलाइफ धोखाधड़ी: ₹5 करोड़ के घोटाले में नौवीं गिरफ्तारी

Web Summary : कोल्हापुर गोल्डलाइफ वितरक धोखाधड़ी मामले में नौवां आरोपी गिरफ्तार। निवेशकों को शेयर बाजार निवेश पर उच्च रिटर्न का लालच दिया गया, जिसके परिणामस्वरूप ₹5.62 करोड़ का नुकसान हुआ। पुलिस ने ₹2.5 करोड़ की संपत्ति जब्त की।

Web Title : Kolhapur Goldlife Fraud: Ninth Arrest in ₹5 Crore Scam

Web Summary : Ninth accused arrested in Kolhapur's Goldlife Distributors fraud case. Investors were lured with high returns on share market investments, resulting in ₹5.62 crore loss. Police seized ₹2.5 crore assets.