Kolhapur: शिरोलीच्या व्यावसायिकावर ‘हनी ट्रॅप’; ५८ लाखांचा गंडा, निवृत्त पोलिस उपनिरीक्षक, महिलेसह ९ जणांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 15:39 IST2025-06-18T15:37:00+5:302025-06-18T15:39:02+5:30

तिघांना जामीन

Nine people including a woman duped a businessman from Shiroli of Rs 58 lakhs by luring him into a web of love and fear | Kolhapur: शिरोलीच्या व्यावसायिकावर ‘हनी ट्रॅप’; ५८ लाखांचा गंडा, निवृत्त पोलिस उपनिरीक्षक, महिलेसह ९ जणांवर गुन्हा

Kolhapur: शिरोलीच्या व्यावसायिकावर ‘हनी ट्रॅप’; ५८ लाखांचा गंडा, निवृत्त पोलिस उपनिरीक्षक, महिलेसह ९ जणांवर गुन्हा

कोल्हापूर : प्रेमाच्या जाळ्यात ओढून जवळीकता साधल्याचे फोटो आणि व्हिडीओची भीती घालत महिलेसह नऊ जणांनी व्यावसायिकास ५८ लाख ५४ हजार रुपयांचा गंडा घातला. हा प्रकार २०१८ ते मे २०२५ दरम्यान घडला. याबाबत व्यावसायिक फारुक महम्मद येळापुरे (वय ३३, रा. शिरोली पुलाची, ता. हातकणंगले) यांनी शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी महिलेसह नऊ जणांवर गुन्हा दाखल केला.

रोजिना अल्लाबक्ष मुल्लाणी, अल्लाबक्ष कासीम मुल्लाणी (दोघे रा. शिरोली एमआयडीसी, कोल्हापूर), मुस्ताक अजीज मुल्ला (रा. पापाची तिकटी, कोल्हापूर), दस्तगीर इस्माईल मुजावर, जमीर दस्तगीर मुजावर (दोघे रा. विशाळगड, ता. शाहूवाडी), जमाल मौलासाहेब येळापुरे (रा. शिरोली एमआयडीसी) यांच्यासह स्वयंसेवी संस्थेचा पदाधिकारी भरतकुमार ढंग, एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी अनिल माळवी आणि निवृत्त पोलिस उपनिरीक्षक आप्पासाहेब कोकितकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला.

येळापुरे यांच्याकडे कामाला असलेला अल्लाबक्ष मुल्लाणी याच्या पत्नीने प्रेमाच्या जाळ्यात ओढून मोबाइलमध्ये दोघांचे काही फोटो आणि व्हिडीओ काढले. हे फोटो नातेवाइकांना दाखवून बदनामी करू, अशी भीती घालून पैसे उकळले. हा प्रकार तिचा पती, वडील आणि इतर नातेवाइकांना समजला. त्यांनीही पोलिसांत तक्रार देण्याची भीती घालून पैसे उकळले. सात वर्षांत तब्बल ५८ लाख ५४ हजार लुबाडूनही ते पैशांची मागणी करीत असल्याने अखेर पोलिसांत फिर्याद दिल्याचे येळापुरे यांनी सांगितले.

या गुन्ह्यातील महिलेसह मुस्ताक मुल्ला आणि दस्तगीर मुजावर यांना जामीन मंजूर झाला आहे. इतरांना अद्याप अटक झालेली नाही.

Web Title: Nine people including a woman duped a businessman from Shiroli of Rs 58 lakhs by luring him into a web of love and fear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.