शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
3
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
4
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
5
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
6
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
7
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
8
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
9
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
10
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
11
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
12
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
18
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
19
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
20
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

तोडफोड प्रकरणातील नऊ जणांना कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:47 IST

महावितरण कंपनीने मनसेचे जिल्हाध्यक्ष गजानन जाधव यांच्या लक्ष्मी औद्योगिक वसाहतीमधील कारखान्याचा वीज पुरवठा खंडित केला होता. याचा जाब विचारत ...

महावितरण कंपनीने मनसेचे जिल्हाध्यक्ष गजानन जाधव यांच्या लक्ष्मी औद्योगिक वसाहतीमधील कारखान्याचा वीज पुरवठा खंडित केला होता. याचा जाब विचारत मनसेच्या कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयाची तोडफोड केली. याप्रकरणी पोलिसांनी मनसेचा जिल्हाध्यक्ष जाधव याच्यासह योगेश दाभोलकर, साहील कोकटनूर, कृष्णा कोपार्डे, सुभाष शेंडे, रोहित कोतकर, वरद फातले, बबलू कांबळे आणि प्रमोद भाटले अशा नऊजणांना अटक केली. दरम्यान, त्यांना शनिवारी न्यायालयात हजर करण्यासाठी नेत असताना मोठे तळ्याजवळ पोलीस व्हॅन बंद पडली. पोलिसांनी व्हॅनला धक्का देऊन सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र, व्हॅन सुरू न झाल्याने संशयितांना पोलिसांनी चालवीत न्यायालयात हजर केले.

चौकट - ऊर्जामंत्र्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही - लांडगे

वीज बिलात सवलत देण्याचे आश्‍वासन देऊनही ऊर्जामंत्री त्याचे पालन करीत नाहीत. त्यामुळे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना कोल्हापूर जिल्ह्यात फिरू देणार नाही, असा इशारा मनसेचे जिल्हा संपर्कप्रमुख जयराज लांडगे यांनी इचलकरंजीत पत्रकारांशी बोलताना दिला. मनसेकडून झालेल्या महावितरणच्या तोडफोडीच्या पार्श्‍वभूमीवर ते इचलकरंजीत आले होते. त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. भविष्यातही वीज पुरवठा खंडित करण्याचा प्रयत्न झाल्यास तो हाणून पाडू, असा इशाराही त्यांनी दिला.

(फोटो ओळी) इचलकरंजीत महावितरणच्या तोडफोडप्रकरणी अटक केलेल्या नऊजणांना पोलिसांनी शनिवारी न्यायालयात हजर केले.