Kolhapur Crime News: पिंपळगाव खुर्द मधील नवविवाहितेची आत्महत्या, चौघांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 18:44 IST2022-03-22T18:41:55+5:302022-03-22T18:44:18+5:30
प्राजक्ताच्या आईने याबाबत कागल पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. यावरुन पती, सासू, सासरे दीर अशा चौघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Kolhapur Crime News: पिंपळगाव खुर्द मधील नवविवाहितेची आत्महत्या, चौघांवर गुन्हा दाखल
कागल : पिंपळगाव खुर्द ता. कागल येथील नव विवाहितेने कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली. प्राजक्ता रोहित जंगटे (वय २४) असे या आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव आहे. प्राजक्ताच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून पती, सासू, सासरे दीर अशा चौघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी कागल पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना काल, सोमवारी (दि.२१) घडली.
पती रोहित महावीर जंगटे (वय-२८), दीर अभिमन्यू महावीर जंगटे ( २५), सासू रेखा महावीर जंगटे (४५), सासरे महावीर देवाप्पा जंगटे(५०, सर्व रा. पिपंळगाव खुर्द) अशी संशयित आरोपींची नावे आहेत.
याबाबत माहिती अशी की, काल, सोमवारी प्राजक्ता हीने आपल्या खोलीत किटकनाशक प्राशन केले. त्रास जाणवू लागल्यानंतर दुपारी बाराच्या सुमारास तिला येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील प्रमिलाराजे रूग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असतांनाच तिचा मृत्यू झाला.
प्राजक्ताच्या आईने याबाबत कागल पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. यावरुन पती, सासू, सासरे दीर अशा चौघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र प्राजक्ताने आत्महत्या का केली याचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही. पोलीस अधिक तपास करीत आहेत.