कोडोली पोलीस ठाण्याला नवी गाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:26 IST2021-04-20T04:26:24+5:302021-04-20T04:26:24+5:30

कोडोली पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात ३१ गावे येत असून बहुंताशी भाग डोंगराळ असा आहे. सध्या वापरात येत असलेल्या गाडीमध्ये ...

New train to Kodoli police station | कोडोली पोलीस ठाण्याला नवी गाडी

कोडोली पोलीस ठाण्याला नवी गाडी

कोडोली पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात ३१ गावे येत असून बहुंताशी भाग डोंगराळ असा आहे. सध्या वापरात येत असलेल्या गाडीमध्ये सातत्याने बिघाड निर्माण होत होता. त्यामुळे ती कुठेही केव्हाही बंद पडत होती. नवीन गाडी मंजूर झाली होती. परंतु नवीन गाडी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तैनातीत व जुनी गाडी कोडोली पोलीस दलाला असेच वास्तव पहायला मिळत होते. त्यामुळे आजवर जुनीच गाडी कोडोली पोलीस वापरत असत. यावर्षी जिल्हा नियोजन मंडळातून विशेष आर्थिक तरतूद करून पोलीस दलास नवीन वाहने प्राप्त करून दिली. यामध्ये कोडोली पोलीस ठाण्यास नवीन बोलेरो गाडी प्रथमच प्राप्त झाली. यामुळे पालकमंत्री सतेज पाटील, पोलीस अधीक्षक बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक काकडे, शाहूवाडी उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक आर.आर. पाटील यांचे आभार नागरिकानी व्यक्त केले.

Web Title: New train to Kodoli police station