‘युनिटी मोटर्स’मध्ये नवीन टाटा सफारीचे अनावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:23 IST2021-03-06T04:23:55+5:302021-03-06T04:23:55+5:30

कोल्हापूर : गोकुळ शिरगाव येथील युनिटी मोटर्समध्ये नवीन टाटा सफारी या चारचाकीचे अनावरण झाले. या चारचाकीच्या कोल्हापुरातील पहिल्या ग्राहक ...

New Tata Safari unveiled at Unity Motors | ‘युनिटी मोटर्स’मध्ये नवीन टाटा सफारीचे अनावरण

‘युनिटी मोटर्स’मध्ये नवीन टाटा सफारीचे अनावरण

कोल्हापूर : गोकुळ शिरगाव येथील युनिटी मोटर्समध्ये नवीन टाटा सफारी या चारचाकीचे अनावरण झाले. या चारचाकीच्या कोल्हापुरातील पहिल्या ग्राहक होण्याचा बहुमान वर्षा सुरेंद्र पाटील यांनी मिळविला. त्यांना युनिटी मोटर्सचे बिझनेस हेड नितीन बनवणे यांच्या हस्ते या चारचाकीची किल्ली प्रदान करण्यात आली. यावेळी सेल्स मॅनेजर अभिजित तावरे, विजय पाटील, सर्जेराव मिठारी आदी उपस्थित होते. नवीन टाटा सफारीची निर्मिती जेएलआरच्या ओमेगा आर्च डी.एट प्लॅटफॉर्मवर केली आहे. या चारचाकीमध्ये इलेक्ट्रिकल पार्किंग ब्रेक, पॅनोरोमिक सनरूफ, मल्टी ड्राइव्ह मोडस आदी आकर्षक नवीन फिचर्स दिले आहेत. नवीन सफारी सिक्स, सेव्हन सिटर आणि मॅन्युअल, ऑटोमेटिक प्रकारात उपलब्ध आहे. या सफारीचे बुकिंग आणि टेस्ट ड्राइव्ह सुरू असल्याची माहिती बनविणे यांनी दिली.

फोटो (०५०३२०२१-कोल-युनिटी मोटर्स फोटो) : गोकुळ शिरगाव येथील युनिटी मोटर्समध्ये नवीन टाटा सफारी या चारचाकीच्या किल्ल्या पहिल्या ग्राहक वर्षा पाटील यांना नितीन बनविणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आल्या. यावेळी शेजारी विजय पाटील, अभिजीत तावरे, सुरेंद्र पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: New Tata Safari unveiled at Unity Motors