शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

पिराचीवाडीची 'सुर्वांगसुंदर गाव' म्हणून नवी ओळख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:25 IST

दत्ता पाटील म्हाकवे : नैसर्गिकदृष्ट्या मागासलेले आणि हमालांचे गाव म्हणून ओळख असणाऱ्या पिराचीवाडीने सरपंच सुभाष भोसले यांच्या पुढाकाराने एकजूट ...

दत्ता पाटील म्हाकवे : नैसर्गिकदृष्ट्या मागासलेले आणि हमालांचे गाव म्हणून ओळख असणाऱ्या पिराचीवाडीने सरपंच सुभाष भोसले यांच्या पुढाकाराने एकजूट दाखवत गावचे नाव जिल्ह्याच्या नकाशावर कोरले. दुर्गम, डोंगराळ सोयी-सुविधांअभावी मागे राहिलेल्या या गावाने झपाटल्याप्रमाणे केवळ दोन वर्षांत गावाचा कायापालट केला. एकसंधपणे घेतलेल्या परिश्रमाचे जिल्हा स्तरावरील प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने चीज झाले.

आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव हा पुरस्कार पिराचीवाडी गावाला जाहीर झाला.

सरपंच सुभाष भोसले यांनी सर्व सदस्य व ग्रामस्थांच्या मदतीने कोट्यवधीचा निधी खेचून आणला. कल्पनाविलासात रंगून जावी अशी वैकुंठभुमी, सुसज्ज, सोयीनीयुक्त ग्रामपंचायत इमारत, गावात सीसीटीव्ही कॅमेरे, रस्त्यांंच्या दुतर्फा झाडे, बंदिस्त गटारे, ऐतिहासिक तलाव यामुळे गावचे रूपडेच पालटले आहे.

दरम्यान, प्रत्येक कामासाठी शासकीय निधीची वाट न पाहता भोसले यांनी नदीतून तीन टप्प्यांत पाणी योजना, ऐतिहासिक बुरुजांची डागडुजी, संपूर्ण गावातील झाडे त्यांंना ठिबक यासाठी लाखो रुपये स्वतःच खर्ची घातले आहेत.

मुश्रीफांचे पाठबळ : भोसले

गावातील विकासाचे श्रेय सरपंच भोसले यांनी मंत्री मुश्रीफ यांच्या पारड्यात टाकले. गल्ली-बोळातील समस्या आणि सामान्य माणसाच्या गरजा माहीत असणारे मुश्रीफांसारखे ग्रामविकासमंत्री लाभणे हे भाग्यच आहे. त्यांच्या भक्कम पाठबळानेच आम्ही यशोशिखरापर्यंत पोहोचू शकलो. तसेच, जि. प. सदस्य मनोज फराकटे यांचेही मोलाचे सहकार्य लाभल्याचे भोसले यांनी सांगितले.