नूतन जिल्हाधिकारी आज पदभार स्वीकारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:19 IST2021-07-15T04:19:01+5:302021-07-15T04:19:01+5:30

कोल्हापूर : कोल्हापूरचे नूतन जिल्हाधिकारी राहुल रेखावार हे आज शुक्रवारी जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. मावळते जिल्हाधिकारी दौलत देसाई ...

The new Collector will assume office today | नूतन जिल्हाधिकारी आज पदभार स्वीकारणार

नूतन जिल्हाधिकारी आज पदभार स्वीकारणार

कोल्हापूर : कोल्हापूरचे नूतन जिल्हाधिकारी राहुल रेखावार हे आज शुक्रवारी जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. मावळते जिल्हाधिकारी दौलत देसाई हे सध्या रजेवर असल्याने प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे या हा पदभार त्यांच्याकडे सुपूर्द करण्याची शक्यता आहे.

शासनाच्यावतीने मंगळवारी रात्री बदल्या जाहीर करण्यात आल्या असून, मावळते जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची मुंबईत वैद्यकीय शिक्षण व औषध विभागाचे सहसचिव म्हणून बदली झाली आहे. रेखावार सध्या अकोल्यात महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते. शिस्तीचे व निर्भीड, धडाकेबाज निर्णय घेणारे अधिकारी म्हणून त्यांची ओळख असून यापूर्वी त्यांनी बीड, धुळे येथे जिल्हाधिकारी म्हणून काम केले आहे. आज शुक्रवारी सकाळी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारतील. त्यानंतर सकाळी अकरा वाजता सेंट्रल कमिटीची कोरोना आढावा बैठक होणार आहे.

---

Web Title: The new Collector will assume office today