पडळ प्राथमिक आरोग्य केंद्रास नवीन रुग्णवाहिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:18 IST2021-05-31T04:18:31+5:302021-05-31T04:18:31+5:30

शब्बीर मुल्ला यवलूज वार्ताहर - पडळ (ता. पन्हाळा) प्राथमिक आरोग्य केंद्रास जिल्हा आरोग्य केंद्राकडून बऱ्यांचदा नवीन रुग्णवाहिका मिळण्यासाठी ...

New ambulance to Padal Primary Health Center | पडळ प्राथमिक आरोग्य केंद्रास नवीन रुग्णवाहिका

पडळ प्राथमिक आरोग्य केंद्रास नवीन रुग्णवाहिका

शब्बीर मुल्ला

यवलूज वार्ताहर - पडळ (ता. पन्हाळा) प्राथमिक आरोग्य केंद्रास जिल्हा आरोग्य केंद्राकडून बऱ्यांचदा नवीन रुग्णवाहिका मिळण्यासाठी वंचित ठेवले जात होते. याबाबत नवीन गाडी मिळणेकामी ‘लोकमत’ने सातत्याने केलेल्या पाठपुराव्याची दखल घेऊन नुकतीच पडळ प्रा. आरोग्य केंद्राला महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाकडून नवीन रुग्णवाहिका देण्यात आली असल्याने ग्रामस्थांतून महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग व ‘लोकमत’चे आभार मानले जात आहे.

या आरोग्य विभागाकडे गेली अनेक वर्षे २००५ मॉडेलची सतत ना दुरुस्त टाटा सुमो गाडी रुग्णवाहिका म्हणून सेवेत होती. अनेकदा ही गाडी बंद अवस्थेत असल्याने आरोग्य केंद्रात उपचारासाठी येणाऱ्या गंभीर रुग्णांना पुढील उपचारांसाठी कोल्हापूर येथे नेण्यासाठी येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांवर बऱ्याचदा बाहेरून गाडी मागवण्याचा प्रसंग आला आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागाने २०१२ पासून पडळ आरोग्य केंद्राला जुनी गाडीच रुग्णवाहिका म्हणून दिली होती. तीच गाडी आजही वैद्यकीय सेवेत होती. ती सुस्थितीत नसल्याने ती वारंवार रस्त्यात बंद पडत होती. गाडीच्या नेहमीच्या त्रासाला कंटाळून जिल्हा परिषद आरोग्य विभाकडे नवीन रुग्णवाहिका मिळण्याकामी पडळ आरोग्य विभागाने वेळोवेळी सुधारीत प्रस्ताव दिले होते. परंतु या आरोग्य केंद्राला नवीन गाडी देण्यापासून दरवेळी वंचित ठेवले होते. यासाठी ‘लोकमत’मधून जिल्हा आरोग्य विभागाकडून दूजाभाव पडळ केंद्रास जुनीच रुग्णवाहिका अशा मथळ्याचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. शिवाय महाराष्ट्र शासन आरोग्य व जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडे सातत्याने पडळ केंद्रास नवीन गाडी मिळणेबाबत ‘लोकमत’मधून पाठपुरावा केला होता. याची दखल घेऊन महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाकडून पडळ प्रा. आरोग्य केंदाला नवीन रुग्णवाहिका मिळाल्याने या केद्रांतर्गत असणाऱ्या १४ गावांतील नागरिकांतून ‘लोकमत’चे अभिनंदन होत आहे.

फोटो ओळ- पडळ आरोग्य केंद्राकडे असलेली ना दुरुस्त जुनी रुग्णवाहिका.

Web Title: New ambulance to Padal Primary Health Center