शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

पोलीस ठाण्याच्या आवारातच नेसरीचा सहाय्यक फौजदार लाचलुचपतच्या जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2022 18:08 IST

अवैध व्यवसायप्रकरणी घरावर छापा टाकला, कडक कारवाईची भिती दाखवली पण कारवाई टाळण्यासाठी ५ हजार रुपयाची लाच स्वीकारली.

कोल्हापूर : अवैध व्यवसायप्रकरणी घरावर छापा टाकला, कडक कारवाईची भिती दाखवली पण कारवाई टाळण्यासाठी ५ हजार रुपयाची लाच स्वीकारताना नेसरी पोलीस ठाण्याचा सहाय्यक फौजदार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला.  पुंडलीक विठ्ठल पाटील (वय ५१ रा. कडलगे, ता. चंदगड) असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.ही घटना शनिवारी दुपारी नेसरी पोलीस ठाण्याच्या आवारात घडली. गेल्या अडीच महिन्यात पोलीस खात्यातील चार लाचखोरीच्या घटनात पाचजण गजाआड डांबले.याबाबत माहिती अशी की, नेसरी पोलीस ठाण्याच्या हद्दील एकाच्या घरावर अवैध व्यवसायप्रकरणी पोलिसांनी छापा टाकला. त्या अनुषंगाने कायदेशीर कारवाई न करण्यासाठी नेसरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार पुंडलीक पाटील यांनी तक्रारदाराकडे पाच हजार रुपयांची लाचेची मागणी केली.तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांना माहिती दिली. पडताळणी अंती लाचेची मागणी केल्याचे दिसून आले. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचला. त्यावेळी तक्रारदाराकडून पाच हजाराची लाच घेताना सहायक फौजदार पुंडलीक पाटील याला पथकाने रंगेहाथ पकडले.ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक आदीनाथ बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश मोरे, सहायक फौजदार संजीव बंबरगेकर, पोलीस नाईक विकास माने, नवनाथ कदम, सुनिल घोसाळकर, सुरज अपराध यांनी केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारी