शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

पाणंद रस्त्यांसाठी लोकचळवळीची गरज :विजया पांगारकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 12:48 IST

Gadhingalj Road collecatoro prant - शेतकर्‍यांसह गावाच्या सोयीसाठीच पाणंद रस्ते आहेत. त्याच्यावर कोणाचीही खाजगी मालकी नाही.त्यावरील अतिक्रमणे दूर करून पाणंदी आनंदी करण्यासाठी लोकचळवळीची गरज आहे,असे मत प्रांताधिकारी विजया पांगारकर यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे पाणंद रस्त्यांसाठी लोकचळवळीची गरज :विजया पांगारकर गडहिंग्लज येथील बैठकीत पाणंदी खुली करण्याच्या मोहिमेचे नियोजन

गडहिंग्लज : शेतकर्‍यांसह गावाच्या सोयीसाठीच पाणंद रस्ते आहेत. त्याच्यावर कोणाचीही खाजगी मालकी नाही.त्यावरील अतिक्रमणे दूर करून पाणंदी आनंदी करण्यासाठी लोकचळवळीची गरज आहे,असे मत प्रांताधिकारी विजया पांगारकर यांनी व्यक्त केले.महाराजस्व अभियानांतर्गत गडहिंग्लज तालुक्यातील पाणंद खुली करण्याची मोहीम राबविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.त्याच्या नियोजनासाठी आयोजित बैठकीत त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. तहसिलदार दिनेश पारगे, पंचायत समिती सदस्य विद्याधर गुरबे यांची प्रमुख उपस्थिती होती.पांगारकर म्हणाल्या, पाणंद रस्ते खुली करण्यासाठी सरपंच, प्रतिष्ठित नागरीक, ग्रामसेवक आणि पोलीस पाटील यांची भूमिका महत्वाची आहे.त्यासाठी सर्वांना एकत्र आणा. वादाच्या ठिकाणी मोजणी करुन घ्या. याप्रसंगी कांही सरपंचानी गावातील पाणंद रस्ते खुली करण्यासंदर्भात निवेदनेही दिली.चर्चेत विकास मोकाशी, रवींद्र घेज्जी, प्रशांत देसाई, रामचंद्र पाटील यांनी सहभाग घेतला. बैठकीस निवासी नायब तहसीलदार अशोक पाटील,नायब तहसीलदार विष्णू बुटे, सरपंच, मंडल अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते. टप्प्याटप्प्याने प्रश्न सोडवू.....!पाणंद रस्त्यासह गायरानातील अतिक्रमणासारखे अनेक प्रश्न गावा-गावांमध्ये आहेत. ज्या समस्या सहज सुटणार्‍या आहेत त्या तातडीने सोडवू, त्यानंतर एकएक गाव घेवून तेथील प्रश्न टप्प्याटप्प्याने सोडवूया असेही पांगारकर यांनी सांगितले. याकडे काळजीपूर्वक पहा.....!कांही पाणंद रस्ते दोन किंवा तीन गावांना जोडलेले आहेत. शहरालगतच्या गावातील पाणंद रस्ते शहराशी किंवा मोठ्या रस्त्यांशी जोडले आहेत, असे रस्ते खुली करताना भविष्यकालीन वापर लक्षात घेवून ते काळजीपूर्वक खुली करा,अशी सूचनाही पांगारकर यांनी केली.'लोकमत'इम्पॅक्ट..!गडहिंग्लज तालुक्यातील सुमारे ८० पाणंद रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात असून त्यासाठी खास मोहीम राबविण्याची गरज आहे. असे वृत्त 'लोकमत'ने शुक्रवारी (१२) प्रसिद्ध केली होते.त्याची दखल घेऊन महसूल खात्याने महाराजस्व अभियांतर्गत अतिक्रमित पाणंदी खुली करण्याची मोहीम आखली आहे.बुधवार (१७) रोजी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याहस्ते या मोहिमेचा प्रारंभ होणार आहे.

 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाkolhapurकोल्हापूरcollectorजिल्हाधिकारीTahasildarतहसीलदार