शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
2
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
3
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
4
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
5
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
6
राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक, १० विद्यार्थी जखमी
7
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
8
तुरुंगात 'प्रशिक्षण', साखळी बॉम्बस्फोटांचे नियोजन, लश्कर-ए-तोयबाशी संबंधित ७ दहशतवाद्यांना एनआयए न्यायालयाने सुनावली शिक्षा
9
’७० ते ८० टक्के नेते पो** पाहतात, सर्वांची चौकशी करा’, पप्पू यादव यांचं आव्हान
10
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
11
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
12
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
13
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
14
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
15
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
16
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
17
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
18
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
19
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
20
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी काँग्रेसची ‘वेळ’ चुकली

By admin | Updated: November 19, 2015 01:13 IST

जि. प.तील सहभाग धुसरच : विधानपरिषदेचा समझोता प्रदेश पातळीवरच

राजाराम लोंढे ल्ल कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सत्तेत वाटा द्यावा, यासाठी काँग्रेसवर दबाव टाकण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची वेळ चुकली. महापालिका सत्तेच्या खेळात राष्ट्रवादीने आपले जिल्हा परिषदेचे प्यादे पुढे करून काँग्रेसचे नाक दाबण्याचा प्रयत्न केला असता, तर कदाचित त्यात यश आले असते. वर्षावर आलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका, पाच वर्षे सोबत ठेवण्याचा ‘स्वाभिमानी’ला दिलेला शब्द, यामुळे जिल्हा परिषदेच्या सत्तेत राष्ट्रवादी सहभागी होण्याची शक्यता फारच धुसर आहे. चार वर्षांपूर्वी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे एकामेकांविरोधात लढले होते. त्यावेळीही महापालिकेसारखीच त्रिशंकू अवस्था झाली होती. काँग्रेस आपल्याला बरोबर घेऊन जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापन करेल, असे राष्ट्रवादीच्या नेत्यांना वाटले; पण कॉग्रेसने स्वाभिमानी शेतकरी संघटनेला बरोबर घेऊन सत्ता स्थापन केली. चार वर्षे जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेसने राष्ट्रवादीच्या सदस्यांची दमछाक केली आहे. निधी वाटप असो अथवा इतर कामांमध्ये दुजाभावाची वागणुकीने राष्ट्रवादीच्या सदस्यांमध्ये नाराजी आहे. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जेमतेम वर्ष बाकी आहे. अध्यक्ष, उपाध्यक्षांसह समिती सभापतींची सव्वा वर्षाची मुदत संपली आहे. त्यामुळे नवीन निवडी करताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेला बाजूला करून उर्वरित एक वर्ष राष्ट्रवादीला सत्तेत सहभागी करून घ्यावे, असा राष्ट्रवादीच्या सदस्यांचा प्रयत्न आहे; पण काँग्रेस ‘स्वाभिमानी’ला बाजूला ठेवणार नाही, हे निश्चित आहे. राष्ट्रवादीच्या सदस्यांनी जरी मागणी केली असली, तरी नेते किती ताकद लावणार यावर बऱ्याच घडामोडी अवलंबून आहेत. विधानपरिषद निवडणुकीच्या तोंडावर सदस्यांनी मागणी केली असली, तरी या निवडणुकीबाबत प्रदेश पातळीवर अगोदरच समझोता झाला आहे. त्यामुळे सदस्य अथवा स्थानिक नेत्यांच्या होय, नाहीला महत्त्व नाही. याऐवजी महापालिका सत्ता स्थापनेत राष्ट्रवादीची भूमिका निर्णायक होती. तिथेच काँग्रेसचे नाक दाबले असते, तर जिल्हा परिषदेच्या सत्तेचे तोंड निश्चितच उघडले असते; पण ते सध्या तरी शक्य नाही. त्यात राष्ट्रवादीचे ए. वाय. पाटील व धैर्यशील माने सोडले, तर एकाही नेत्याच्या घरातील अथवा जवळचा सदस्य नाही. कार्यकर्त्यांसाठी कोणी ताकद खर्च करेल, असे वाटत नाही. जाच कमी करण्यासाठीच प्रयत्न बहुतांश मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या प्रबळ उमेदवारांना पराभूत करूनच काँग्रेसचे सदस्य जिल्हा परिषदेत पोहोचले आहेत. त्यामुळे काँग्रेसचे सदस्य सुरुवातीपासूनच राष्ट्रवादीला पाण्यात बघत आहेत. निधी वाटपासह गेली ४ वर्षे सापडेल त्या ठिकाणी उट्टे काढण्याची एकही संधी काँग्रेसने सोडलेली नाही. आता सत्तेत सहभागी नसेना; पण उर्वरित काळात निधी वाटपातील जाच कमी व्हावा, यासाठीच राष्ट्रवादीच्या सदस्यांची ही धडपड आहे. विद्यमान पदाधिकाऱ्यांनाच मुदतवाढ? विद्यमान पदाधिकाऱ्यांचा सव्वा वर्षाचा कालावधी संपत आला आहे. निवडी करताना नेत्यांनी सव्वा वर्षानंतर दुसऱ्यांना संधी देण्याचे आश्वासन दिले होते; पण आजपर्यंतचा दोन्ही काँग्रेसचा इतिहास पाहता विद्यमान पदाधिकारीच उर्वरित कालावधीसाठी कायम राहतील अशी शक्यता आहे.