शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतातील एकमेव व्यक्ती, ज्यांचा थेट देवाशी संपर्क", राहुल गांधींची PM मोदींवर बोचरी टीका
2
भारत नक्षलमुक्त देश कधी होणार? गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितली टाईमलाईन
3
“संजय राऊतांनी आपल्या पक्षाची, घराची काळजी करावी, देश अन् आमचा पक्ष...”: प्रविण दरेकर
4
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."
5
विराट कोहली RCB च्या पराभवामुळे स्ट्रेसमध्ये? BCCI ला केली खास विनंती अन् म्हणूनच तो...  
6
आश्चर्यकारक! मंत्र्याच्या बंगल्यातील कडुलिंबाच्या झाडाला लागले आंबे; सगळेच हैराण
7
MI ने दिले १५ कोटी, BCCI देते ५ कोटी, मुंबईत 8BHK फ्लॅट अन्...; हार्दिक पांड्याची एकूण संपत्ती किती?
8
शरद पवार गटातील हुकूमशाही, अहंभावाला कंटाळले, ६ जूननंतर महायुतीत इन्कमिंग; शिंदे गटाचा दावा
9
दिल्लीत भाजपाला किती जागा मिळतील? आचार्य प्रमोद कृष्णम यांनी निकालापूर्वी केलं भाकीत 
10
९९ रुपयांची स्कीम की मृत्यूचं निमंत्रण?; गेमिंग झोनच्या भयंकर आगीत ३५ जीव गेले
11
विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त स्मृतिस्थळावर पोहचले संपुर्ण देशमुख कुटुंब, वडिलांसाठी रितेशनं शेअर केली भावुक पोस्ट
12
Sachin Tendulkar : "बाबा, तुमची खूप आठवण येते, आजही तू जुनी खुर्ची...", 'क्रिकेटचा देव' भावूक!
13
नियमबाह्य काम करण्यासाठी मंत्र्याचा दबाव; निलंबित आरोग्य अधिकाऱ्याच्या पत्रानं खळबळ
14
हार्दिक पांड्याबरोबर घटस्फोटाच्या चर्चा अन् मिस्ट्री मॅनसोबत स्पॉट झाली नताशा! कोण आहे तो?
15
नाशिकमध्ये सापडली २६ कोटींची रोकड अन् ९० कोटींची मालमत्ता; पैसे बाहेर काढण्यासाठी तोडलं फर्निचर
16
"तुमची मुलं रात्री कुठं जातात, काय करतात?"; पुणे अपघातानंतर बिल्डरांना अजितदादा काय म्हणाले?
17
IPL 2024 Final Prize Money: जिंका किंवा हरा...! पैशांचा पाऊस निश्चित; जाणून घ्या बक्षिसांची रक्कम
18
"बुडणाऱ्या कंपनीचे शेअर्स कोणी विकत घेईल का?", नरेंद्र मोदींचा सपा आणि काँग्रेसवर हल्लाबोल 
19
"भ्रष्ट अधिकाऱ्यांचे लाड, प्रामाणिक अधिकाऱ्यांवर कारवाई? शिंदे सरकारच्या टेंडरबाज मंत्र्यांचा प्रताप"; वडेट्टीवारांचा आरोप
20
पुणे अपघात प्रकरणी गृहमंत्र्यांनी त्यांची जबाबदारी पाळली, त्यामुळे...; शरद पवारांचं विधान

‘राष्ट्रवादी’च्या उमेदवार चर्चेला फुलस्टॉप : हसन मुश्रीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2019 1:09 AM

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या उमेदवारीबद्दल उलटसुलट चर्चा सुरू आहे; परंतु कार्यकर्त्यांनी या चर्चेला आता फुलस्टॉप द्यावा व पक्ष देईल त्या उमेदवाराच्या पाठीशी राहून त्यास प्रचंड मतांनी निवडून आणावे असे आवाहन पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ

ठळक मुद्देपक्ष देईल त्या उमेदवाराच्या पाठीशी राहा; राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावापाच राज्यांतील पराभवाने भाजप हतबल

कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या उमेदवारीबद्दल उलटसुलट चर्चा सुरू आहे; परंतु कार्यकर्त्यांनी या चर्चेला आता फुलस्टॉप द्यावा व पक्ष देईल त्या उमेदवाराच्या पाठीशी राहून त्यास प्रचंड मतांनी निवडून आणावे असे आवाहन पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी सोमवारी येथे केले. उमेदवार कोण याबद्दलची संदिग्धता मात्र त्यांनी कायम ठेवल्याने कार्यकर्त्यांत तिथेच चर्चा सुरू झाली. मुंबईत झालेल्या बैठकीत आपणही ही निवडणूक लढविण्यास तयार असल्याचे मुश्रीफ यांनी जाहीर केले होते. त्या पार्श्वभूमीवर केलेल्या या आवाहनाबद्दल तर्कवितर्क लढविले जात आहेत.

पक्षातर्फे काढण्यात येणारी राज्यव्यापी ‘परिवर्तन यात्रा’ २७ जानेवारीला येथे येणार आहे. त्याच्या तयारीसाठी ताराबाई पार्क येथील कार्यालयात बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. महापौर सरिता मोरे, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळोखे, शहराध्यक्ष आर. के. पोवार, राजेंद्र पाटील-यड्रावकर, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, राजेश लाटकर, महिला जिल्हाध्यक्ष संगीता खाडे, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती संगीता पाटील, आदी उपस्थित होते.

मुश्रीफ म्हणाले, ‘कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. उमेदवारीवरून जो काही वाद झाला ते आपल्या घरातील भांडण होते. उमेदवारी कुणाला द्यायची याचे सर्व अधिकार पक्षाध्यक्ष शरद पवार यांना आहेत, त्यामुळे ते कुणाला उमेदवारी देतील, त्याच्या पाठीशी ठामपणे राहू, हाडाची काडे व रक्ताचे पाणी करून त्याला प्रचंड संख्येने निवडून आणू.

पक्षाच्या स्थापनेपासून पाचवेळा राष्टÑवादी कॉँग्रेसचा कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात खासदार झाला आहे. दिवंगत सदाशिवराव मंडलिक यांचा अपवाद वगळता एकदाही अन्य कोणत्याच पक्षाचा उमेदवार या मतदारसंघातून विजयी झालेला नाही. त्यामुळे यावेळेलाही राष्ट्रवादीचाच उमेदवार विजयी होईल, त्यामुळे कार्यकर्त्यांनी शंका न बाळगता कामाला लागावे.’...तर पालकमंत्र्यांची हत्तीवरून मिरवणूक काढूआॅगस्ट ते आॅक्टोबर या काळात शेतकऱ्यांकडे पैसे असतात, त्यामुळे ३० हजार भरणाºयांना तीन हजार परतावा व ५० हजार भरणाºयांना ५ हजार परतावा व्याजाच्या माध्यमातून वेतन म्हणून शेतकºयाला दिले जातील, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले आहे; परंतु हे पैसे भरणे शेतकºयांना शक्य होणार नाही, ते पालकमंत्र्यांनी भरल्यास त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढू, असे आव्हान मुश्रीफ यांनी दिले.उद्धव ठाकरेंचे कौतुकशिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण राज्यात दौरे केले. यावेळी त्यांना कर्जमाफी झालेला शेतकरी भेटला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. सरकारमध्ये असून त्यांनी अशा पद्धतीने सत्य बोलणे हे कौतुकास्पद आहे, असे मुश्रीफ म्हणाले.पाच राज्यांतील पराभवाने भाजप हतबलपाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीतील पराभवाने भाजप हतबल झाला आहे. त्यामुळे गेल्या निवडणुकीप्रमाणे यावेळीही चुनावी जुमले करून खोटी आश्वासने दिली जाणार आहेत. त्यासाठी कार्यकर्त्यांनी जागरूक राहून भाजपचा हा खोटारडेपणा जनतेसमोर आणण्याचे काम करावे, असे मुश्रीफ यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरNCPराष्ट्रवादी काँग्रेसHassan Mianlal Mushrifहसन मियांलाल मुश्रीफ