शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी हाच खरा शत्रू

By admin | Updated: July 13, 2014 00:42 IST

काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक : १५ वर्षांची दोस्ती तोडण्याची कार्यकर्त्यांची मागणी

कोल्हापूर : राज्यात शिवसेना-भाजप या पक्षांपेक्षा आपला खरा शत्रू हा राष्ट्रवादी कॉँग्रेसच आहे. या पक्षाच्या नेत्यांनी गेल्या पंधरा वर्षांत कॉँग्रेसची व मुख्यमंत्र्यांची केली तेवढी बदनामी आता पुरे झाली. म्हणूनच राष्ट्रवादी कॉँग्रेसबरोबरची दोस्ती तोडून आता काँग्रेस पक्षाने आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढावी, अशी आग्रही मागणी आज, शनिवारी दुपारी कॉँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केंद्रीय निरीक्षकांपुढे केली. प्रत्येक निवडणुकीत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, नेते काँग्रेसला मदत करीत नाहीत, उलट अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात, असा थेट आरोपही यावेळी करण्यात आला. अखिल भारतीय कॉँग्रेस महासमितीचे निरीक्षक माजी मंत्री रघुवीरसिंग मीना यांनी आज, येथील कॉँग्रेस कार्यालयात जाऊन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या. सुरुवातीला त्यांनी एकत्रित बैठकीत कार्यकर्ते, नेत्यांची मते जाणून घेतली, त्यानंतर त्यांनी विधानसभा मतदारसंघनिहाय कार्यकर्त्यांना भेटून त्यांचीही मते जाणून घेतली.कॉँग्रेसने विधानसभा निवडणूक स्वबळावर लढावी, असा एकमुखी ठरावही यावेळी केला. पक्षश्रेष्ठींना कोल्हापूरकरांची भूमिका ठामपणे सांगावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. प्रदेश कॉँग्रेसचे कार्याध्यक्ष जयवंतराव आवळे यांनी सर्वप्रथम स्वबळाचा सूर आळवला. त्यानंतर आमदार सा. रे. पाटील, जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, मंत्री सतेज पाटील, भरमू सुबराव पाटील, कल्लाप्पाण्णा आवाडे, सुरेश कुराडे या सुरात सूर मिळवीत कॉँग्रेसचे स्वतंत्र अस्तित्व ठेवायचे असेल तर स्वबळावर लढावे, तसा आग्रह पक्षश्रेष्ठींपुढे धरावा, अशी मागणी केली. शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांनी आभार मानले. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उमेश आपटे, उपाध्यक्ष हिंदुराव चौगुुले, उपमहापौर मोहन गोंजारे, माजी आमदार दिनकरराव जाधव, संजीवनीदेवी गायकवाड, सरलाताई पाटील, संध्या घोटणे, बाळासाहेब सरनाईक यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)